9 Reasons for Loss of Appetite

Reasons for Loss of Appetite

Here are the reasons for loss of appetite:-

Many people complain of not feeling hungry or not eating. The reasons for not feeling hungry can be both physical and mental. Not feeling hungry for a few days may be normal, but if you are not hungry for many days, then it is definitely a matter of concern. Because the body gets nourishment from the food you eat, the body’s wear and tear is replenished.

In such a case, if the body does not get enough food and nutrients like vitamins and minerals due to the problem of not feeling hungry, this can have adverse effects on our body, so the problem of not feeling hungry should not be ignored. For this, information has been given here about what causes loss of appetite and how to increase appetite.

There can be many reasons behind loss of appetite or loss of appetite. Hunger can be affected by anything from physical to psychological factors.

  1. Physical causes include loss of appetite due to various diseases. Many diseases such as cold, fever, jaundice, stomach diseases, vomiting, indigestion, constipation, worm infestation, gas in the stomach, gallstones, diabetes, etc. cause loss of appetite.
  2. Women may also experience loss of appetite during menstruation, pregnancy or menopause.
  3. In adults, appetite also decreases with age. Due to the slowing down of digestion in old age, even if you eat a little, you feel full for a long time, so appetite also decreases with age.
  4. Many medications also cause loss of appetite. Especially antibiotics, antifungals, and muscle relaxants can cause loss of appetite.
  5. Medications for depression, migraine, high blood pressure, chronic diseases, and tremor (Parkinson’s) can cause loss of appetite.
  6. Mental causes include stress, fear, and depression. Work stress or exam stress can cause loss of appetite.
  7. This problem can also be caused by insufficient sleep. Not getting enough sleep can lead to lethargy, irritability, and fatigue throughout the day, resulting in complaints of loss of appetite.
  8. Improper diet, i.e. fast food, junk food, chips, snacks, cold drinks, and drinking a lot of tea and coffee, can also cause complaints of loss of appetite while eating.
  9. Addictions like alcohol, smoking, cigarettes, and tobacco can also cause loss of appetite.

Treatments for loss of appetite are as follows:-

Treatments to increase appetite include proper diet, exercise and medicines.

Eat a proper diet to increase appetite –
To increase appetite, eat a proper diet that is easily digestible. Stay away from fast food, junk food, snacks, cold drinks. Make sure that the stomach is clean regularly. For this, the diet should include fiber. Green leafy vegetables and various fruits are rich in fiber. Drink enough water. Drink about eight glasses of water a day. Also, stay away from various addictions.

9 Reasons for Loss of Appetite

भूक न लागण्याची ही आहेत कारणे :-

भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा तक्रारी अनेकांना असतात. भूक न लागण्याची कारणे ही शारीरिक आणि मानसिकही असू शकतात. काही दिवसांसाठी भूक न लागणे हे सामान्य बाब असू शकते मात्र जर अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे. कारण घेतलेल्या आहारातूनच शरीराचे पोषण होत असते, शरीराची झीज भरून काढली जाते.

अशावेळी भूक न लागण्याच्या समस्येमुळे पुरेसे अन्न आणि व्हिटॅमिन, खनिजे यासारखी पोषकतत्वे शरीरास न मिळाल्यास याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात म्हणूनच भूक न लागण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. यासाठी येथे भूक कशामुळे कमी होते व भूक कशी वाढवावी याविषयी माहिती दिली आहे.

भूक न लागण्यामागे किंवा भूक कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. अगदी शारिरीक कारणांपासून ते मानसिक कारणामुळेही भूकेवर परिणाम होत असतो.

  1. शारीरिक कारणांमध्ये विविध आजारांमुळे भूक कमी होते. सर्दी, ताप, काविळ, पोटाचे आजार, उलटी, अपचन, बद्धकोष्ठता, कृमींचा त्रास, पोटात गॅस होणे, पित्ताशयात खडे होणे (gallstone), मधुमेह अशा अनेक आजारांत भूक कमी होते.
  2. महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी, प्रेग्नन्सीमध्ये किंवा रजोनिवृत्तीमध्येही भूक कमी होऊ शकते.
  3. प्रौढ व्यक्तीमध्ये वाढत्या वयाबरोबर भूकदेखील मंदावते. उतारवयात पचनक्रीया मंदावल्याने थोडेसे खाल्ले तरी बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वय वाढल्यानेही भूक कमी होत असते.
  4. अनेक औषधांमुळेही भूक कमी होते. विशेषतः अँण्टीबायोटिक्स, अँटीफंगल्स, आणि Muscle relaxant औषधांमुळे भूक कमी होऊ शकते.
  5. डिप्रेशन, मायग्रेन, उच्च रक्तदाब, क्रॉनिक आजार आणि कंपवात (पार्किन्सन) या आजारावरील औषधे सुरू असल्यास भूक कमी होऊ शकते.
  6. मानसिक कारणांमध्ये ताणतणाव, भीती, डिप्रेशन यांमुळे भूक कमी लागत असते. कामाच्या ताणामुळे किंवा परीक्षेच्या तणावामुळे भूक न लागण्याची समस्या होऊ शकते.
  7. अपुरी झोप झाल्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. पुरेशी झोप न मिळाल्यास दिवसभर सुस्ती येते, चिडचिड वाढते आणि थकवा येतो परिणामी भूक न लागण्याची तक्रार सुरू होते.
  8. अयोग्य आहार म्हणजे फास्टफूड, जंकफूड, चिप्स, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स, भरपूर चहा-कॉपी पिण्यामुळेही ‘अन्न जेवताना’ भूक न लागण्याची तक्रार सुरू होते.
  9. दारू, मद्यपान, सिगारेट, तंबाखू यासारख्या व्यसनांमुळेही भूक कमी होत असते.
भूक लागण्यासाठी असे केले जातात उपचार :-

योग्य आहार, व्यायाम आणि औषधे याद्वारे भूक वाढवण्यासाठी उपचार केले जातात.

भूक वाढीसाठी योग्य आहार घ्यावा –
भूक लागण्यासाठी सहज पचणारा योग्य आहार घ्यावा. फास्टफूड, जंकफूड, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्सपासून दूर राहावे. पोट नियमित साफ राहील याची काळजी घ्यावी. यासाठी आहारात फायबर्सचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, विविध फळे यांमध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात साधारण आठ ग्लास पाणी प्यावे. तसेच विविध व्यसनांपासून दूर राहावे.

Leave a Comment