BARTI Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था BARTI पुणे
28 ट्विंस गार्डन कॅम्प पुणे 411002
(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था)
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा 2023 24 या प्रशिक्षणासाठी पुणे व नाशिक येथे निशुल्क अनिवासी प्रशिक्षण कोचिंग साठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेसाठी निशुल्क अनिवासी प्रशिक्षण कोचिंग खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र युवक युतींनी खालील लिंक वर लिंक वरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.👉👉👉👉 http://register.bartieducare.in/student/register
BARTI Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute पुणे व नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण संस्थामार्फत अनुक्रमे पुणे करीता 200 व नाशिककरिता 200 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्यामध्ये तीस (30%) टक्के जागा महिलांसाठी, चार (४%) टक्के जागा दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी, पाच (५%) टक्के जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील (वाल्मीकी व तत्सम जाती होलार, बेरड, मातंग, मांग मादगी इत्यादी) विद्यार्थ्यांकरीता आरक्षित असतील.
एकूण जागांच्या पाच (५%) टक्के जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येतील.
* पात्रता *👇👇👇 उमेदवाराची पात्रता👇👇👇👇
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र असावे.
- उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
- उमेदवाराचे वय महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवेच्या अटी व शर्तीनुसार असावे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 2023-24 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा बसण्याकरिता पात्र असावा.
- रुपये आठ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल.
विद्यार्थी निवडीचे निकष :- प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने यादीतील रुपये आठ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या सर्व पात्र उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.
* परीक्षेचे स्वरूप *👇👇👇👇👇👇
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेच्या धर्तीवर असेल.
* प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती *👇👇👇👇👇
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 ही असेल.
- प्रशिक्षण कालावधी बारा महिन्यांचा राहील.
- पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा दिनांक 30 जुलै 2023 रोजी घेण्यात येईल.
- उमेदवारांची गुणानुक्रमे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
- निवड झालेल्यांपैकी पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दरम्यान रोज चार तास व त्यापेक्षा जास्त कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येईल.
- तसेच एकूण दरमहा 80 टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहील त्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये 9000 विद्यावेतन देण्यात येईल.
- विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज ऑनलाईन ऑफलाईन व विशेष शैक्षणिक साहित्य व पुस्तके यासाठी प्रति विद्यार्थी रक्कम रुपये 25000 विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
- प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणतीही शासकीय निमशासकीय खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही.
- ज्या उमेदवारांनी यापूर्वी भारती पुणे मार्फत एमपीएससी (mpsc) महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व यूपीएससी (UPSC) नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण यापूर्वी घेतले असेल त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही.
- सदर योजनेबाबत प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक तेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे सर्व अंतिम अधिकार माननीय महासंचालक भारती तसेच राहतील शासनास राहतील.
- BARTI Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute…
धन्यवाद…