We have a saying that eat breakfast like a king, lunch like a princess and dinner like a beggar. This will highlight how important it is to have a full breakfast in the morning. Start the day with healthy food. Because the strength and energy required for the whole day is obtained from this breakfast. Morning breakfast is very beneficial for health. If you skip breakfast in the morning it will have an adverse effect on your body. Serious diseases may also be faced at a young age. Therefore, it is necessary to have breakfast in the morning for good health.
सकाळचा नाश्ता राजा सारखा, दुपारचे जेवण राजकुमारा सारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्या सारखे करावे, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. यावरुनच सकाळी भरपेट नाश्ता करणे किती गरजेचं असतं हे अधोरेखित होईल. दिवसाची सुरुवात ही सकस आहाराने करावी. कारण दिवसभर लागणारी शक्ती व उर्जा या न्याहारीतून मिळते. आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता हा अत्यंत लाभदायक असतो. जर तुम्ही सकाळी नाश्ता करणे टाळत असाल त्याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होतो. कमी वयात गंभीर आजारांचा सामनाही करावा लागू शकतो. त्यामुळं उत्तम आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता करणे गरजेचे आहे.
Benefits of having a hearty breakfast in the morning…सकाळी भरपेट नाश्ता करण्याचे फायदे…
Breaking the word breakfast means break – the fast. That is, after fasting all night, we eat something, that is, we end the fast. That is why the body needs healthy food in the morning. Eating breakfast with proper amount and nutritional value keeps memory and cognitive power good. Eating nutritious food in the morning helps in reducing bad cholesterol in the body. Also, diabetes, heart disorders, weight control.
ब्रेकफास्ट या शब्दाची फोड केल्यास ब्रेक – द फास्ट असा अर्थ होतो. म्हणजेच रात्रभर उपवास केल्यानंतर आपण काहीतरी खातो म्हणजेच आपण उपवास संपवतो. म्हणूनच शरीरासाठी सकाळी सकस अन्न गरजेचं असते. योग्य प्रमाणात व योग्य पोषणमूल्य असलेला नाश्ता केल्यास स्मरणशक्ती व आकलन शक्ती चांगली राहते. सकाळी पोषणयुक्त आहार घेतल्यास शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसंच, मधुमेह, हृदयाचे विकार, वजन नियंत्रणात राहते.
What to eat for breakfast?…नाश्ता मध्ये काय खावे?
If you are eating bread-butter, tea-chapati or tea biscuits for breakfast in the morning, change this habit now. Breakfast should include traditional breakfast foods. Pohe, Upma, Sabudana Khichdi, Thalipeeth, Nachani Ukad. At the same time, you can use foods like Nachani Ambil, Ghabane, Amboli, Nachani Sattva, Bajra Dhapata, Porridge in breakfast.
सकाळी नाश्तामध्ये ब्रेड-बटर, चहा-चपाती किंवा चहा बिस्किट असे पदार्थ खात असाल तर आत्ताच ही सवय बदला. नाश्तामध्ये पारंपारिक नाश्ताच्या पदार्थाचा समावेश करावा. पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, थालीपीठ, नाचणीची उकड. त्याच बरोबर, नाचणीचे आंबील, घावणे, आंबोळी, नाचणी सत्त्व, बाजरीचे धपाटे, लापशी असे पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये वापरु शकता.
Calories are reduced…कॅलरीज कमी होतात…
Eating in the morning increases the metabolism. It also burns body calories throughout the day and gives you energy throughout the day. Also, if you forget to eat during the day, it also affects your work.
सकाळी न्याहारी केल्याने मेटाबॉलिजम वाढते. त्यामुळं दिवसभर शरीरातील कॅलरी देखील बर्न होतात आणि तुम्हाला दिवसभर उर्जा मिळते. तसंच, दिवसा नाश्ता करण्यास विसरलात तर त्याचा तुमच्या कामावर देखील परिणाम होतो.
Diabetes remains under control…मधुमेह नियंत्रित राहतो…
Eating daily also helps in controlling diabetes. At the same time, the blood sugar level remains stable. Morning breakfast should be rich in fruits, grains and protein.
रोज नाश्ता केल्यास मधुमेह नियंत्रित राहण्यासही मदत होते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहते. सकाळची न्याहारी फळ, धान्य आणि प्रथिनेयुक्त असावी.
No feeling of fatigue…थकवा जाणवत नाही…
Skipping breakfast will make you feel tired throughout the day. Even after getting a full eight hours of sleep, you will feel lethargic and tired.
नाश्ता न केल्यास दिवसभर तुम्हाला थकवा जाणवेल. पूर्ण आठ तासांची झोप पूर्ण केल्या नंतरही तुम्हाला आळस व थकवा जाणवेल.
Get kids used to breakfast…मुलांना लावा नाश्ताची सवय…
Children who wake up early in the morning and go to school do not go to breakfast in a hurry. So his hemoglobin is low. That makes it difficult for them to understand what is taught in school. Also, it can take a habit to forget. Therefore, it is necessary to make children used to breakfast.
सकाळी लवकर उठून शाळेत जाणारी मुलं घाईघाईत नाश्ता करुन जात नाही. त्यामुळं त्याचे हिमोग्लोबिन कमी असते. त्यामुळं त्यांना शाळेत शिकवलेले आकलन करायला त्रास होतो. तसंच, विसरण्याची सवयही लागू शकते. म्हणून मुलांना नाश्ताची सवय लावणे गरजेचे आहे.