
Bile Acidity :- Acidosis…
Nowadays, the word acidity is everywhere. Even medicine will not find a person who says he does not have acidity or bile problems.
What exactly is acidity?
For the digestion of our food, the amount of hydrochloric acid, pepsin, gastrin, etc. in the stomach increases, which means bile and acidity. Our wrong diet, lifestyle, habits, stress, travel, arguments, quarrels, and running are the reasons for increasing this amount.
The following wrong habits related to diet increase bile.
Let us understand why and how bile increases ….
1) Eating in a hurry causes the stomach to fill up with food and when it is not digested properly, gases are formed and the space called fundus in the stomach is used for gas production. When this space is filled with food, there is no space left for digestion and bile is produced. Just like when you pack your clothes in a bag as you like, less clothes will fit and they will get wrinkled. But if you iron and fold them properly, more clothes will fit.
2) Lying down immediately after a meal sometimes causes the cardiac sphincter, where the esophagus ends, to open and the food is thrown up and sour mucus comes to the throat. Therefore, do not sleep after lunch and sleep at least 2 hours after dinner.
3) Excessive consumption of acidic foods like curd, green chillies, tur dal, meat, eggs, dal, flour, junk food, tea, coffee, fast food, tobacco products, alcohol, betel nut, gram flour, urad dal, etc. irritates bile even more. To digest these heavy foods, more acidic secretions are released from the stomach and as a result acidity increases.
4) Extremely sweet foods increase acidity, because since extremely sweet foods are difficult to digest, they increase heat and acidic secretions inside the stomach.
5) As is the diet, so is the nature. If you eat foods that are hot, spicy, acidic, and have similar properties to bile, then bile will increase and bile will increase.
6) Irregular sleep is the cause of increased bile. Night waking, parties, getting up late, and sleeping in the afternoon definitely increase the problem of bile. It takes 5-6 hours to digest starchy foods, 8-10 hours to digest oily foods, and 6-8 hours to digest proteins. 4 hours of sleep is enough to digest alkaline and alkaline foods. But it is not known that one should sleep as much as one eats. And this increases bile.
7) Consumption of excessive sugary foods and oily foods causes excessive thirst and drinking too much water does not digest food properly, resulting in increased bile.
8) Eating too much food also increases bile.
After reading all the above, you must have easily realized that acidity is the great enemy of health and youth. For this, 2/3 of the food in the daily diet should be alkaline and only 1/3 acidic. Now what are alkaline foods? – So fruits, vegetables, milk, buttermilk, cabbage, almonds, pistachios, cow ghee etc. Also, consuming alkaline and sattvic fruits reduces bile. For this, you have to give your stomach a rest by skipping meals. There is a shutdown week in the factory, so why not give your stomach a rest for a few hours…
Karla juice, amla juice and ginger juice will help your digestion. They will reduce the stress on your liver. But all these things will work temporarily, so it is best to follow important diet and exercise rules. Foods like garlic, white onion, salad, fenugreek, and moong in your daily diet will not only help your large intestine in digestion but will also cleanse your stomach. But those who have severe problems with bile should not eat onion and garlic raw, they should cook them with food. To reduce acidity in the body, you will have to follow a diet. You will have to stop drinking tea, coffee, and addictions. It is an important point that reheating stale and refrigerated foods and eating them again and again increases acidity to a great extent… which we do frequently. Drinking tea and coffee is also an addiction…
The main reason for increasing acidity is lack of exercise, hard work…then do daily exercise, cycling, swimming, yoga, aerobics, Surya Namaskar…etc. One should do one of these. After meals, it is necessary to sit in Vajrasana for 10-15 minutes…and then do Shatapavali. To improve digestion, asanas like Pawanmuktasana, Dhanurasana, Bhujangasana, Vajrasana etc. should be done under the guidance of a qualified expert.

पित्त (ऍसिडिटी ) :- आम्लपित्त …
हल्ली जिकडे तिकडे ऍसिडिटी या शब्दाने उच्छाद मांडला आहे. ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास नाही असे म्हणणारा माणूस औषधाला सुद्धा सापडणार नाही.
ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय?
आपल्या अन्नाच्या पचनासाठी जठरात असणाऱ्या हायड्रोक्लोरिक ऍसिड ,पेप्सीन ,ग्यास्ट्रीन इ.
या स्रावांचं प्रमाण वाढत म्हणजे पित्त होत ……
ऍसिडिटी होते. हे प्रमाण वाढविण्यासाठी आपला चुकीचा आहार,विहार,सवयी ,ताणतणाव
,प्रवास,वाद,दगदग,धावपळ या गोष्टी कारणीभूत ठरतात.खालील आहारविहारासंबंधी चुकीच्या सवयी पित्त वाढवतात.
पित्त का व कसे वाढते ते आपण समजून घेऊ ….
१) घाईघाईने जेवल्याने जठरात अन्न कोंबून कोंबून भरले जाते व ते नीट न पचल्याने ग्यासेस तयार होतात व जठरात फंड्स नावाची जागा वायू खेळण्यासाठी असते तीच जागा अन्नाने भरल्याने पचनाला जागा उरात नाही व पित्ताची निर्मिती होते. जस प्रवासाला जाताना बॅगेत वाटेल तसे कपडे कोंबले तर कमी कपडे बसतात शिवाय ते चुरगळतात .,पण तेच इस्त्री करून नीट घडी करून भरल्यास जास्त कपडे बसतात .
२) जेवणानंतर लगेच आडवे झाल्याने काही वेळा अन्ननलिका जिथं संपते तिथली कार्डियाक स्पिंक्टर हि झडप उघडून अन्न वर फेकले जाते व आंबट गुळण्या घशाशी येतात ,म्हणून दुपारी जेवणानंतर झोपू नये व रात्री जेवणानंतर कमीतकमी २ तासांनी झोपावे.
३) आम्लधर्मी पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन दही हिरवी मिरची,तूरडाळ,मांसाहार,अंडी,डालडा,मैदा,बेकारी पदार्थ,चहा,कॉपी,फास्ट फूड,तंबाखू जन्य पदार्थ,,दारू,सुपारी,बेसनाचे,उडीद डाळीचे पदार्थ,इत्यादींनी पित्त अधिकच खवळते. हे जड पदार्थपचनासाठी जठरातून जास्त ऍसिडिक स्त्राव सोडले जातात व परिणामी ऍसिडिटी वाढते.
४) अति गोड पदार्थांनी ऍसिडिटी वाढते ,कारण हेच कि अति गोड पदार्थ पचायला जड असल्याने जठर आत उष्णता व ऍसिडिक स्त्राव वाढवते.
५) जसा आहार तशी प्रकृती .उष्ण,तीक्ष्ण,आम्लधर्मी पित्ताशी सामान गुणधर्माचे पदार्थ खाल्यास समानाने समानाची वृद्धी होऊन पित्त वाढतेच.
६) पित्त वाढण्याला झोपेची अनियमितता कारणीभूत ठरते. रात्रीची जागरणे ,पार्ट्या, उशिरा उठणे,दुपारची झोप याने हमखास पित्ताचा त्रास बळावतो. पिष्टमय पदार्थाच्या पचनासाठी ५-६ तास,तेलकट पदार्थांच्या पचनासाठी ८-१० तास, प्रथिनांच्या पचनासाठी ६-८ तास वेळ लागतो. क्षारयुक्त,अल्कली पदार्थांच्या पचनासाठी ४ तास झोप पुरेशी होते. पण जस अन्न तशी झोप घ्यावयाची हे माहीतच नसते. व त्यामुळे पित्त वाढते.
७) अतिरुचकर पदार्थ , तेलकट पदार्थांच्या सेवनाने जास्त तहान लागते व पाणी जास्त प्यायले गेल्याने अन्नाचे पचन नीट होत नाही परिणामी पित्त वाढते.
८) जास्त प्रमाणात अन्न घेतल्यामुळेही पित्त वाढते.
वरील सर्व गोष्टी वाचून आपल्या सहज लक्षात आलं असेल कि आम्लता आरोग्याचा व तारुण्याचा महान शत्रू आहे. यासाठी रोजच्या आहारात २/३ पदार्थ अल्कली व फक्त १/३ आम्लधर्मी असायला हवेत. आता अल्कालाईन पदार्थ कोणते?-तर फळे,पालेभाज्या,दूध,ताक,कोबी,बदाम,पिस्ते,गाईचे तूप इत्यादी… तसेच क्षारयुक्त व सत्त्वयुक्त फळांच्या सेवनाने पित्त कमी होते.यासाठी लंघन करून पोटाला विश्रांती द्यावी लागते. कारखान्यात शटडाऊन वीक असतो,मग आपण काही तास तरी पोटाला विश्रांती नको का द्यायला …
कारल्याचा रस ,आवळ्याचा रस आल्याचा रस तुमच्या पचनाला मदत करतील. तुमच्या लिव्हर वरचा ताण कमी करतील. परंतु या सर्व गोष्टी तात्पुरत्या काम करतील ,त्यामुळे महत्वाचे आहाराचे व विहाराचे नियम पाळलेले सर्वात उत्तम. तुमच्या रोजच्या जेवणातील लसूण,पांढरा कांदा,सलाड,मेथीची भाजी,मोडाचे मूग अश्या पदार्थातून तुमच्या मोठ्या आतड्याला चोथा (फायबर )मिळून पचनास मदत होईलच शिवाय पोट हि साफ होईल. पण ज्यांना पित्ताचा खूपच त्रास आहे त्यांनी कांदा व लसूण कच्चा खाऊ नये ,जेवणातून शिजवून खावा. शरीरातील आम्लता कमी करण्यासाठी तुम्हाला पथ्य पाळावेच लागेल. चहा ,कॉपी,व्यसने, बंद करावी लागतील. शिळे,शीतकपाटात ठेवलेले अन्नपदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने खूप प्रमाणात आम्लता वाढते हा महत्वाचा मुद्दा अनावधानाने सांगायचं राहिलाच … जे आपण वारंवार करतो. चहा कॉपी हे सुद्धा व्यसनच आहे …
ऍसिडिटी वाढण्याचे महत्वाचे कारण म्हणजे व्यायामाचा,कष्टाचा आभाव…तेव्हा रोज व्यायाम सायकलिंग,पोहणे,योग,एरोबिक्स,सूर्यनमस्कार…इत्यादी. पैकी काहीतरी केलं पाहिजे. जेवणानंतर १०-१५ मिनिटे वज्रासनात बसने…व नंतर शतपावली करणे जरुरी आहे. पचनशक्ती सुधारण्यासाठी पवनमुक्तासन,धनुरासन,भुजंगासन,वज्रासन आदी आसने योग्यतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करावीत .
