Causes, Symptoms and Treatment of Asthma

Causes, Symptoms and Treatment of Asthma

What is asthma?

Asthma is a serious respiratory disease in which the patient experiences an asthma attack. In this, the airways become narrow and swollen. This leads to excessive production of mucus. This causes difficulty in breathing. Due to the accumulation of mucus in the throat, a wheezing or whistling sound is made during breathing.

Symptoms of Asthma:-

  • Coughing occurs, coughing more frequently at night or in the morning.
    Coughing spasms occur more frequently, but the phlegm is so stuck in the chest that the person becomes tired of coughing but the phlegm does not come out. Breathing becomes suffocating, after coughing for a long time, even if a little phlegm falls out, it feels better for a while. But the cough comes again.
  • Shortness of breath, restlessness, frequent chest tightness, difficulty speaking can be symptoms of asthma.

Causes of Asthma:-

  • The main cause of asthma is a defect in the body’s immune system. The following factors contribute to the development of asthma attacks in asthma patients.
  • Asthma attacks occur due to cloudy weather, humid weather such as winter and rainy season.
  • Asthma attacks occur due to exposure to dust, smoke, fog, soil, garbage, fine fibers, pollen, pet hair, paints, strong odors, cigarette or other types of smoke, physical overwork, excessive exercise, hormonal imbalance.
  • Asthma patients are at higher risk of asthma attacks due to air pollution, which causes diseases such as fever, flu, sore throat, bronchitis, cough,
  • Mental stress increases the risk of asthma attacks.
Precautions to take to avoid Asthma :-
  • The measures to be taken to prevent asthma attacks are as follows. One can stay away from asthma attacks through proper diet, exercise and proper medication,
  • After the first asthma attack, one should be alert to avoid such a situation in the future, do not smoke,
  • Stay free from mental stress, stay away from dust, smoke, air pollution,
  • Asthma patients should not keep pets at home,
  • Take special care during the rainy season and winter.
  • Avoid going out in the intense heat,
  • Do not eat cold foods, do not drink cold water, go for walks in the open air, eat a diet rich in vitamins A and D, almonds, green leafy vegetables should be in the diet.
  • Take the treatment prescribed by the doctor.

What is an Asthma attack?

Asthma patients often experience asthma attacks, also known as asthma attacks. Often, asthma patients can experience asthma attacks due to dust, smoke, pollen, furry pets, humid weather, intense sunlight, garbage, air pollution particles, and mental stress. An asthma attack can last from a few minutes to a few hours.

Asthma attack

Causes, symptoms and treatment of asthma…

दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास
घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय असा आवाज योतो.

अस्थमाची लक्षणे :-

खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.
खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही. श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.

दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.

दमा होण्याची कारणे :-

  • शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमधील विकृती ही दमा रोगास प्रमुख कारण असते. खालील कारणे ही दमा रुग्णांमध्ये दमा अटॅक निर्माण होण्यास सहाय्यक ठरतात.
  • ढगाळ वातावरण, हिवाळा व पावसाळा ह्या सारख्या आर्द्र वातावरणामुळे अस्थमा अटॅक येतो.
  • धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, पेंट्स, उग्र वास असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे अस्थमा अटॅक येतो, सिगरेट किंवा इतर प्रकारचा धूरामुळे, शारीरीक अतिश्रमामुळे, अतिव्यायामामुळे, हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे.
  • वायु प्रदुषणामुळे ताप, फ्लू, घसा सुजणे, ब्राँकायटिस, खोकला यासारखे रोग उत्पन्न झाल्याने,
  • मानसिक ताणतणावामुळे अस्थमा रुग्णांना अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.
दम्याचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी :-
  • अस्थमाचा अटॅक येऊ नये यासाठी करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत. योग्य आहार, विहार आणि योग्य औषधोपचाराद्वारे दम्याच्या अटॅकपासून दूर राहता येते,
  • दम्याचा पहिला दौरा आल्यानंतर भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून सतर्क रहावे, धुम्रपान करु नये,
  • मानसिक ताणतनाव रहित रहावे, धुळ, धूर, हवेच्या प्रदुषणापासून दूर रहावे,
  • दमा रुग्णांनी घरात पाळीव प्राणी पाळू नयेत,
  • पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी.
  • प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे,
  • थंड पदार्थ खाऊ नये, थंड पाणी घेऊ नये, मोकळ्या हवेत फिरावयास जावे, विटामिन A आणि D युक्त आहार घ्यावा, बदाम, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात.
  • डॉक्टरांनी दिलेले उपचार घ्यावेत.

दम्याचा झटका येणे किंवा अस्थमाचा अटॅक येणे म्हणजे काय ?

दम्याच्या रुग्णांना वरचेवर दम्याचा झटका येत असतो त्याला अस्थमा अटॅक (Asthma attack) असेही म्हणतात अनेकदा दमा रुग्णास धुळ, धुर, परागकण, केसाळ पाळीव प्राणी, दमट हवामान, प्रखर सुर्यकिरण, कचरा, हवेतील प्रदूषित कण व मानसिक ताणामुळेही अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. अस्थमाचा अटॅक काही मिनिटांपासून ते काही तासापर्यंत राहू शकतो.

Leave a Comment