World AIDS Day December 1

AIDS

Every year, December 1 is observed as ‘World AIDS Day’.

  • The United Nations (UNO) has declared that this day should be observed worldwide to create awareness about the deadly disease AIDS (Acquired Immune Deficiency Syndrome).
    In August 1987, James W. Bunn and Thomas Netter presented the concept at the World Health Organization’s global program in Geneva.
    After Dr. Mann’s agreement, this day was observed from December 1, 1988. World AIDS Day was first celebrated by James W. Bunn and Thomas Netter in Geneva, Switzerland in 1988.
    According to an article published in the journal ‘Science General’, AIDS originated in the city of Kinshasa. This city is now known as the Republic of Congo. According to that article, scientists have researched the genetic code samples of the AIDS virus. In this research, it is revealed that this virus was created in the city of Kinshasa.
    Interestingly, the disease was discovered 30 years after the creation of AIDS. A new study has also found that the human immunodeficiency virus, i.e., lentiviruses (viruses that constantly change their structure) related to the AIDS virus, existed in male apes in Africa for 160 million years.
    Welkin Johnson of Boston College in the United States and his colleagues have tried to unravel the history of lentiviruses (a type of retroviruses) that constantly change their internal structure.
    A research team from Oxford and the University of Leuven in Belgium tried to reconstruct the family tree of AIDS.
    According to scientists, HIV is a mutated form of the chimpanzee virus. It is known as simian immunodeficiency virus.
    The city of Kinshasa was a major bushmeat market. Therefore, it is possible that the virus entered the human body through infected blood. This virus has spread through various means. This virus entered the body of chimpanzees, gorillas and finally humans.
    Meanwhile, HIV-1 infected millions of people in Cameroon. After that, the virus spread worldwide.
  • To get to the root of why this happened, we have to look back a few decades. Until 1920, the city of Kinshasa was part of the Belgian Congo.
    Until 1966, it was known as Leopoldville. This city was very large and it was growing rapidly. At that time, various sexually transmitted diseases were increasing rapidly. At the same time, the number of men for every woman in Kinshasa was two. Due to this, prostitution increased. During this period, both types of viruses continued to grow rapidly.
    The needles used in health camps helped the virus to grow. Also, another reason for the growth of HIV was the railway network.
    By the end of 1940, about one million people were moving to and from Kinshasa. This caused this type of disease to increase even more.
    In a developed country like America, a sudden disease struck people around 1981.
    The deaths of homosexual men due to a mysterious disease had created panic in America in the early eighties. These people had lost their immunity and due to this, they were found to have other diseases. It was noticed that the people suffering from this disease were also dying at a rapid rate. However, it happened in America as well as anywhere else. The government did not take this matter very seriously.
    The government was even avoiding talking about it. Around the same time, two scientists, Luc Montagnier (France) and Robert Gallo (America), independently discovered the Human Immunodeficiency Virus, which ravages the human body, in 1983-84.
    This virus, which became known as the disease of homosexuals, started wreaking havoc in America and Africa before anyone knew it.
    In America, it was described as the ‘gay plague’. After 1986, AIDS became known to the public as a disease of prostitutes in India.
    By the dawn of 1987, as many as 40,000 American citizens had fallen victim to HIV AIDS. The then Foreign Minister of South Africa warned, ‘The Terrorists Are Now Coming to Us with a Weapon More Terrible than Marxism: AIDS’.
  • The year was 1986, when the first AIDS patient in India was diagnosed in a brothel in Chennai. Subsequently, patients started being found in many big cities, wherever there were facilities for AIDS testing, and the news of the emergence of the demon called AIDS spread far and wide.
    On the one hand, the spread of HIV virus and AIDS infection was increasing due to unprotected sex, contaminated blood transfusion, transmission from mother to fetus or breastfeeding child, use of intravenous drugs. The immune system of any person is measured by the number of his CD4 (CD-4) lymphocytes.
    Since the HIV virus attacks these ‘CD4 lymphocytes’, the patient loses his immune system and quickly becomes a victim of any other infection.
    When these viruses multiply rapidly in the body and the number of immune cells in the body, i.e. the number of CD4 count, falls below 200, various diseases arise in these patients. Because their resistance to common germs and viruses is also weakened.
    In such cases, viruses such as tuberculosis, herpes, and fungi attack. The patient’s death is also caused by infection with these ‘communicable’ germs. The most prominent of such infections are tuberculosis germs. In Africa, homosexuals were stoned to death, while in India, school children living with HIV were burned alive. An atmosphere of fear and terror spread in the society.
    Not only relatives; but also doctors started rejecting positive people. Dead bodies started being desecrated. Around the same time, Hollywood actor Rock Hudson (1985), basketball player Michael ‘Magic’ Johnson (1991) etc. in America decisively announced their AIDS status.
    The United Nations recognized the seriousness of the situation and established UNAIDS (1996).
    Bill and Melinda Gates, recognizing the extent of the disease, announced a large portion of their income for rehabilitation and research. After that, Bill Clinton, Richard Gere, Nelson Mandela, etc., joined the anti-AIDS campaign, starting a new chapter of global commitment that changed the direction of thinking and action.
    There is a need to create widespread awareness about the terrible diseases AIDS and HIV infection.
    For this, December 1 is observed as World AIDS Day. Due to widespread awareness in the past few years, the rate of HIV infection has decreased to some extent. However, the threat still remains.
World AIDS Day

दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून पाळला जातो.

  • जगभर फैलावलेल्या एड्स (AIDS – Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने (UNO) घोषित केले आहे.
    ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांची संकल्पना मांडली.
    डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला.
    ‘सायन्स जनरल’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखानुसार एड्सची उत्पत्ती ही किन्शासा शहरात झाली आहे. हे शहर आता कॉन्गो गणराज्याच्या नावाने ओळखले जाते. त्या लेखानुसार, शास्त्रज्ञांनी एड्सच्या विषाणूच्या जेनेटीक कोडच्या नमून्यांचं संशोधन केलं आहे. या संशोधनात हे विषाणू किन्शासा शहरात निर्माण झाल्याचं समोर येत आहे.
    विशेष म्हणजे एड्सची निर्मिती झाल्यानंतर ३० वर्षांनी या रोगाची माहिती झाली. तसेच ह्य़ूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजे एड्स विषाणूशी संबंधित असलेले लेंटिव्हायरसेस (सतत रचना बदलणारे विषाणू) हे आफ्रिकेतील नर वानरांमध्ये १.६० कोटी वर्षांपासून अस्तित्वात होते असेही नवीन अभ्यासात निष्पन्न झाले आहे.
    अमेरिकेतील बोस्टन महाविद्यालयाचे वेलकिन जॉन्सन व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतर्गत रचना सतत बदलणाऱ्या लेंटिव्हायरसेस (रेट्रोव्हायरसेसचा एक प्रकार) या विषाणूंचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
    ऑक्सफर्ड आणि बेल्जियम विद्यापीठाच्या लूवेन विद्यापीठाच्या संशोधन चमूने एड्सच्या फॅमिली ट्रीची पुनर्रसंरचना करण्याचा प्रयत्न केला.
    शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार HIVचा हा चिंपांजीचा वायरसचं परिवर्तित रूप आहे. हा सिमियन इम्युनोडिफिसिएंसी वायरसच्या नावाने ओळखला जातो.
    किन्शासा शहर हे बुशमीटची मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे संक्रमित झालेल्या रक्तामुळे हा वायरस मनुष्याच्य़ा शरीरात आला असण्याची शक्यता आहे. हा वायरस विविध माध्यमातून पसरला आहे. या वायरसने चिंपांजी, गोरिल्ला आणि शेवटी माणासाच्या शरिरात प्रवेश केला.
    दरम्यान HIV-१ ने कॅमरून शहरातील लाखो लोकांना संक्रमित केलं. त्यानंतर हा वायरस जगभरात पसरला.
  • असं का घडलं हे याच्या मुळाशी जायचं असेल तर काही दशकं मागे पाहावे लागेल. १९२० पर्यंत किन्शासा शहर हे बेल्जियम कॉन्गोचा भाग होता.
    १९६६ सालापर्यंत त्याला लियोपोल्डविले नावाने ओळखले जात होतं. हे शहर बरेच मोठे होते आणि याची वाढ वेगात होत होती. त्यावेळी वेगवेगळ्या यौनसंबंधांचे आजार मोठ्या वेगात वाढत होते. त्याच काळात किन्शासा शहरात एका स्त्रीच्या मागे दोन पुरूष अशी संख्या झाली. त्यामुळे वेश्याव्यवसाय वाढला. या काळात दोन्ही प्रकारचे वायरसमुळे वेगाने वाढत राहिले.
    आरोग्य शिबिरात वापरल्या गेलेल्या सुईमुळे हा वायरस वाढण्यास मदत झाली. तसंच HIV वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे रेल्वे जाळं.
    १९४० च्या शेवटात जवळपास १० लाख लोक किन्शासा शहरात ये-जा करत होते. त्यामुळे हा प्रकार आणखी वाढला.
    अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये १९८१च्या सुमारास अचानक एका विकाराने लोकांना झपाटल्यागत अवस्था झाली.
    समलिंगी पुरुषांच्या गूढ आजारामुळे होत असलेल्या मृत्यूच्या घटनांनी ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी अमेरिकेत दहशत निर्माण केली होती. या लोकांची रोगप्रतिकारशक्ती लोप पावलेली होती आणि त्यामुळे इतरही रोग त्यांना झालेले आढळले. या विकाराने ग्रस्त झालेल्या मंडळींचा मृत्यूही वेगात होतो आहे, हे लक्षात आले. मात्र इतरत्र कुठेही होते तसेच अमेरिकेतही झाले. सरकारने हे प्रकरण काही फारसे गांभीर्याने घेतलेले नव्हते.
    सरकार तर त्या विषयी बोलणेही टाळत होते. त्याच सुमारास लुक माँटानिये (फ्रान्स) आणि रॉबर्ट गॅलो (अमेरिका) या दोन शास्त्रज्ञांनी १९८३-८४ मध्ये मानवी शरीर पोखरून काढणार्‍या ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरसचा स्वतंत्रपणे शोध लावला.
    समलिंगींचा आजार अशी ओळख बनलेल्या या व्हायरसने कुणाला कळायच्या आतच अमेरिका आणि आफ्रिका खंडात थैमान घालायला सुरुवात केली.
    अमेरिकेत त्याचे ‘गे प्लेग’ असे वर्णन केले गेले. १९८६ नंतर भारतात शरीरविक्रय करणारया महिलांचा रोग म्हणून एड्सची लोकांना ओळख झाली.
    १९८७ उजाडे पर्यंत तब्बल ४० हजार अमेरिकन नागरिक HIV एड्सला बळी पडले होते. द. आफ्रिकेच्या त्या वेळच्या परराष्ट्रमंत्र्याने ‘द टेररिस्ट्स आर नाउ कमिंग टू अस वुइथ अ वेपन मोअर टेरिबल दॅन मार्क्सिझम : एड्स’ असा इशारा दिला.
  • वर्ष होतं १९८६, जेव्हा चेन्नईच्या वेश्यावस्तीत भारतातल्या पहिल्या एड्सच्या रुग्णाचं निदान झालं. पाठोपाठ अनेक मोठय़ा शहरातून, जिथे जिथे एड्सच्या तपासण्यांची सुविधा होती अशा ठिकाणी रुग्ण सापडू लागले आणि एड्स नावाचा भस्मासुर देशात उत्पन्न झाल्याची बातमी सर्वदूर पसरली.
    एकीकडे असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त संक्रमण, मातेकडून गर्भाला किंवा स्तनपान करणाऱ्या बाळाला संक्रमण, शिरेतून नशा आणणाऱ्या औषधांचा वापर या सर्व गोष्टींतून HIV विषाणूंचा प्रसार आणि एड्सची लागण वाढतच चाललेली होती. कोणत्याही व्यक्तीची रोगप्रतिबंधक शक्ती त्याच्या सीडीफोर (CD-४) लिम्फोसाइट या रक्तपेशीच्या संख्येवरून मोजली जाते.
    HIVचा विषाणू या ‘सीडीफोर लिम्फोसाइट’ वरच हल्ला करत असल्यानं रुग्ण आपली प्रतिकारक शक्ती गमावून बसतो आणि कोणत्याही इतर जंतुसंसर्गाला चटकन बळी पडतो.
    या विषाणूंची शरीरात झपाट्याने वाढ होऊन शरीरातील प्रतिकार करणाऱ्या पेशींचे प्रमाण म्हणजे सीडी ४ काऊंटचे प्रमाण २०० च्या खाली गेले असता या रुग्णांमध्ये निरनिराळे रोग उद्भवतात. कारण त्यांची सर्वसाधारण जंतू आणि विषाणूंचीही प्रतिकार करण्याची शक्ती मंदावलेली असते.
    अशात क्षयरोग, नागीण, बुरशी अशा प्रकारचे विषाणू हल्ला करतात. रुग्णाचा मृत्यू या ‘संधिसाधू’ जंतूंच्या संसर्गामुळेही होत असतो. अशा संसर्गात सर्वात अग्रणी आहेत ते क्षयरोगाचे जंतू. आफ्रिकेत समलिंगींना दगडांनी ठेचून मारण्यात येऊ लागले, तर भारतात HIVसह जगणार्‍या शाळकरी मुलांना जिवंत जाळण्यापर्यंत मजल गेली. समाजात भीतीचे, दहशतीचे वातावरण पसरले.
    नातेवाइक सोडाच; पण डॉक्टरही पॉझिटिव्ह व्यक्तींना झिडकारू लागले. मृतदेहांची विटंबना होऊ लागली. त्याच सुमारास अमेरिकेत हॉलिवूड अभिनेता रॉक हडसन (१९८५), बास्केटबॉलपटू मायकल ‘मॅजिक’ जॉन्सन (१९९१) आदींनी निर्धाराने आपले एड्स स्टेटस जाहीर केले.
    संयुक्त राष्ट्रसंघाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यूएनएड्सची स्थापना (१९९६) केली.
    बिल आणि मेलिंदा या गेट्स दाम्पत्याने रोगाची व्याप्ती ओळखून पुनर्वसन आणि संशोधनासाठी आपल्या कमाईतला मोठा हिस्सा जाहीर केला. त्यापाठोपाठ बिल क्लिंटन, रिचर्ड गेर, नेल्सन मंडेला आदींनी एड्स विरोधी मोहिमेत आपला सहभाग नोंदवल्याने विचार आणि कृतीची दिशा बदलून टाकणाऱ्या वैश्विक बांधिलकीच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली.
    महाभयंकर रोग असलेल्या AIDS आणि HIV संसर्गा बाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.
    यासाठीच १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून पाळला जातो. गेल्या काही वर्षां पासून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने HIVची लागण होण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. तरी देखील अद्याप धोका कायम आहे.

Leave a Comment