What Time Should You Exercise?

What Time Should You Exercise?

Morning or Evening? When do you Exercise to lose weight faster?

Many people exercise and do hard workouts to lose weight. But the time you exercise is also important when it comes to losing weight. At what time do you exercise? Many people may not even know that there is a right time to exercise. So let’s learn about this in detail.

Different people have different ideas about exercise. Some like to exercise in the evening, while others prefer to exercise in the morning. There are some people who exercise in the afternoon because they have time at that time. A study has shown that exercising in the morning is more beneficial than exercising during the day. Exercising in the evening or afternoon will not burn as much fat as exercising in the morning.

Researchers from Sweden’s Karolinska Institute and the University of Copenhagen conducted a study on mice. The study found that morning exercise burns fat faster. The study showed that by exercising in the morning, a person can burn fat stored in the body faster than in the evening. Morning exercise is always good.
Professor Julian Gierth of the Karolinska Institute said that our results suggest that exercising late in the morning can also be good for increasing metabolism and reducing fat. But exercising late in the evening will not benefit you as much. If you want to lose weight, morning exercise can be good for you.

In a study conducted on mice, scientists subjected mice to high-intensity workouts twice a day and studied the effects on their adipose tissue. During the study, they monitored which genes were active in the adipose tissue. The scientists found that genes that boost metabolism were more active in the morning slot, no matter how much you ate. Previous studies have suggested that exercising early in the morning on an empty stomach can help with weight loss and boost energy levels.

What Time Should You Exercise?

कोणत्या वेळेत एक्सरसाइज Exercise करावी ?

वजन कमी करण्यासाठी बरेच जण एक्सरसाइज, हार्ड वर्कआउट करत असतात. मात्र वजन कमी करताना तुमची एक्सरसाइझ करण्याची वेळही महत्वाची ठरते. तुम्ही कोणत्या वेळेत एक्सरसाइज करता? बऱ्याच लोकांना एक्सरसाइजची योग्य वेळही असून शकते याची कल्पना नसेल. तेव्हा याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.

Morning की Evening? कोणत्या वेळेत एक्सरसाइज केल्यास झपाट्याने वजन कमी होतं?

वेगवेगळ्या लोकांच्या व्यायामाबद्दल वेगवेगळ्या कल्पना असतात. काहींना संध्याकाळी व्यायाम करणे आवडते, तर काहींना सकाळी व्यायाम करणे पसंत असते. असे काही लोक आहेत जे दुपारी व्यायाम करतात कारण त्यांना त्यावेळी वेळ मिळतो. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, सकाळी व्यायाम करणे दिवसभराच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरते. संध्याकाळ किंवा दुपारच्या व्यायामाने सकाळच्या व्यायामाइतकी चरबी बर्न होणार नाही.

स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूट आणि कोपनहेगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत उंदरांवर अभ्यास केला. या अभ्यासात असे आढळून आले की सकाळच्या व्यायामामुळे चरबी फास्ट बर्न होते. संशोधनात असे दिसून आले आहे की सकाळी व्यायाम केल्याने, एखादी व्यक्ती शरीरात साठलेली चरबी संध्याकाळच्या तुलनेत लवकर बर्न करु शकते.सकाळचा व्यायाम कधीही चांगला.
कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर ज्युलियन गिएर्थ म्हणाले की, आमचे निकाल असे सूचित करतात की सकाळी उशिरा व्यायाम करणे देखील चयापचय वाढविण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी चांगले सिद्ध होऊ शकते. पण संध्याकाळी उशिरा व्यायामाचा तुम्हाला तेवढा फायदा होणार नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळचा व्यायाम तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो.

उंदरांवर केल्या गेला अभ्यासशास्त्रज्ञांनी उंदरांना दिवसातून दोनदा उच्च-तीव्रतेच्या वर्कआउट्सवर सेट केले आणि त्यांच्या ऍडिपोज टिश्यूवरील परिणामाचा अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान, त्यांनी अॅडिपोज टिश्यूमध्ये कोणती जनुके सक्रिय असल्याचे निरीक्षण केले. शास्त्रज्ञांना असे आढळले की चयापचय वाढवणारी जीन्स सकाळच्या स्लॉटमध्ये जास्त होते, मग तुम्ही किती खाल्ले हे महत्वाचे ठरत नाही. याआधीही अभ्यासांनी असे सुचवले आहे की सकाळी लवकर रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने वजन कमी करण्यात आणि ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते.

Leave a Comment