Soil is a very important resource. To draw the attention of people around the world to this element and to create awareness about the need for soil conservation, December 5 is celebrated as ‘World Soil Day’. Healthy soil is the foundation of healthy food production. Soil is the foundation of various crops and agriculture.
90 percent of food requirements are met through soil. Soil is required to grow forests. One-fourth of the earth is covered by various organisms and soil plays a significant role in maintaining this biodiversity.
Soil has the ability to trap, store and purify water. Soil is invaluable. Our basic needs of food, clothing and shelter cannot be met without soil. Although concepts such as soilless farming have emerged in the modern era, it does not have the power to feed the world’s population.
Soil is not made in a factory. It takes thousands of years to form soil. When various factors such as sun, wind, rain and water flow affect rocks, soil is formed. This process continues for millions of years.
Approximately 1 cm. It takes thousands of years to form a layer of soil. This soil contains the remains of dead animals, animal feces, and decayed plant remains. Soil is made up of two types of materials: organic matter and mineral matter. Many soil particles combine to form soil.
10 to 15 cm of the soil. The soil layer is formed from the perspective of life on earth. This is the most important part.
It would not be wrong to say that soil is a person’s life…
Soil erosion occurs due to wrong methods of farming, excessive deforestation, uncontrolled grazing, wind, heavy rain, etc.
This soil layer, formed over thousands of years, takes a very short period of time to disappear.
To meet the food needs of such a large population, it is necessary to increase food grain production. For this, it is necessary to create awareness among the people. Proper management of food and soil fertility are of utmost importance for sustainable agriculture. Due to lack of use of organic fertilizers, unbalanced fertilizer supply, lack of crop rotation, etc., the properties of the soil are changing and a large amount of nutrient deficiency is being seen.
Soil fertility is deteriorating and its health is deteriorating. Soil changes according to the region. We have studied various types of soil.
It would not be wrong to say that soil is the life of an individual. Because the basic need of man, food, is met by soil. Elements in soil are required for crop growth.
Soil fertility is deteriorating and its health is deteriorating…
Since land is a limited natural resource, it is necessary to maintain the health of the land in good condition to meet future needs by properly cultivating it. For this, it is necessary to adopt appropriate management methods according to local needs.
It is necessary to maintain the fertility of the land and increase the productivity per hectare by using crop selection according to the type of land, balanced use of fertilizers according to soil tests, crop rotation, regular use of organic fertilizers, etc. For this, it is necessary to create awareness among the people.
Due to factors such as excessive use of chemical fertilizers and lack of organic fertilizers, the practice of growing the same crop one after the other, the increasing need for food grains and the resulting heavy burden on agriculture, etc., the fertility of the land is decreasing. This is having undesirable effects on the growth, production, productivity and quality of crops. Therefore, it is necessary to focus on increasing production and maintaining soil fertility by using various tools properly.
So that we can rightfully call it ‘our soil’, let us try to preserve the soil, which is like a mother to the entire world, and preserve its fertility. This will be the true gratitude to the mother of farmers and laborers. On the occasion of World Soil Day, let us also preserve the soil to preserve ourselves. What can we say about the importance of soil, let us save the selfless food giver that satisfies the hunger of the hungry, i.e. the soil.
माती (मृदा) हा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे.
अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा मातीद्वारे पूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे.
मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.
माती कारखान्यात तयार होत नाही. माती तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पाऊस व पाण्याचा प्रवाह अशा विविध गोष्टींचा परिणाम खडकांवर झाला की खडकांची झीज होऊन माती तयार होते. लाखो वर्षे ही प्रक्रिया सुरू असते.
साधारण १ सेंमी. मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. या मातीमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष, प्राण्यांची विष्टा, कुजलेल्या वनस्पतींचे अवशेष असतात. सेंद्रिय पदार्थ व खनिज पदार्थ अशा दोन प्रकारच्या पदार्थांनी माती बनते. अनेक मातीचे कण मिळून जमीन तयार होते.
जमिनीतील १० ते १५ सेंमी. मातीची थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने तयार होतो. हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो.
५ डिसेंबर जागतिक माती दिन म्हणून साजरा केला जातो…
शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते.
हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन आणि जमिनीची सुपिकता यांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सेंद्रीय खतांच्या वापराचा अभाव, असंतुलित खत पुरवठा, पीक फेरपालटीचा अभाव इत्यादीमुळे जमिनींचे गुणधर्म बदलत असून मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे.
जमिनीची सुपीकता खालावत चाललेली असून तिचे आरोग्य बिघडत असल्याचे दिसून येत आहे. प्रदेशनुसार माती मध्ये बदल होतो. मातीचे विविध प्रकार आपण अभ्यासले आहेत.
माती म्हणजे व्यक्तीचं जीवन अस म्हणणं गैर ठरणार नाही. कारण माणसाची अन्न ही मूलभूत गरज मातीमुळे भागवली जाते. पिकाच्या वाढीसाठी मातीमधील घटकांची आवश्यकता असते.
माती म्हणजे व्यक्तीचं जीवन अस म्हणणं गैर ठरणार नाही…
जमीन हा मर्यादीत स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करुन भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक गरजेनुसार योग्य व्यवस्थापन पद्धतीचे अवलंबन करण्याची गरत आहे.
जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा नियमित वापर, इत्यादींचा वापर करुन जमिनीची सुपिकता टिकवुन ठेवणे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
रासायनिक खतांचा वारेमाप वापर व सेंद्रिय खतांचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार इत्यादी घटकांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या साधनांचा योग्य वापर करून उत्पादन वाढविणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्याकडे भर देणे गरजेचे आहे.
‘आमची माती’ असं हक्काने म्हणता यावे, यासाठी संपूर्ण जगाला पोसण्यासाठी स्वतः आई समान झिजणाऱ्या मृदेला अबाधित ठेऊन, तिची सुपीकता राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या माऊलीसाठी हीच खरी कृतज्ञता ठरेल. जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने चला तर मग, स्वतःला जपण्यासाठी मृदेलाही जपूया. मातीची महती काय सांगावी, भुकेल्यांची भूक भागविणाऱ्या निस्वार्थ अन्नदात्रीला म्हणजेच मृदेला वाचवूया.