Let’s see what permissive parenting is and how it is becoming dangerous.
Nowadays, where do we have 3 or 4 children? We have an only child. If we don’t pamper him, then who will we pamper him for?” “Who does he earn so much for?” “Oh, he or she is so stubborn that in the end it becomes unbearable and he does whatever he says, who will listen to his constant whining.” Many such sentences come to our ears. If for some reason or the other you too are fulfilling all the demands of your children and providing them with something immediately when they ask for it, then you should understand what the experts say about this. Famous parenting counselor Shweta Gandhi has given some simple tips in this regard. She has clearly stated some things about how such permissive parenting is not good for children and parents, let’s see which ones. permissive parenting.
Do you also say ‘yes’ to everything your children want just to avoid any hassle?
Fulfilling all the demands of children, not instilling in them the habit of refusal, and providing children with things without considering the necessity of what they ask for is called permissive parenting. Due to this type of parenting, children become more and more stubborn. They expect everything to be done their way. If that does not happen, they become stubborn. Such children do not understand rules and boundaries. Especially, parents who fulfill all the demands of their children in this way have difficulty in self-discipline and emotional regulation. These children also find it difficult to behave in society. To prevent this from happening, while loving and pampering, children should also be introduced to discipline and rules in a timely manner. permissive parenting.
How to discipline children ?
1. There should be clear boundaries…
Some simple and easy rules should be set for children. Parents should be strict with those rules. This way, children understand the rules and boundaries and change (permissive parenting) themselves accordingly.
2. Teach balanced discipline…
Discipline should be firm, not harsh, but loving and follow the rules, and the purpose behind them should be clearly explained. This is definitely beneficial for the development of children.
3. Focus on becoming self-reliant…
Let children fulfill their responsibilities. Let them learn the consequences.
4. Teach control over emotions…
Children should be helped to identify their emotions and manage them appropriately, which will unconsciously instill in them a calm attitude.
5. Encourage problem solving…
Encourage children to find solutions to the challenges they face and to take responsibility.
6. Reduce screen time…
Most importantly, keep your children involved in activities like games and reading, so that their screen time is reduced. There should be clear boundaries regarding screen time so that it doesn’t get in their way.
परमिसिव्ह पॅरेंटिंग म्हणजे काय ?
हल्लीच्या काळात कुठे ३, ४ मुलं असतात. आमचं एकुलतं एक मूल आहे. त्याचे लाड नाही करणार तर कोणाचे करणार?” “एवढं कमवतो कोणासाठी?” “अहो, तो किंवा ती इतका हट्टीपणा करतात, की शेवटी नाईलाज होतो आणि ते म्हणतील तसं करुन टाकतो, सततची भुणभुण कोण ऐकत राहणार.” अशी अनेक वाक्य आपल्या कानावर पडत असतात. काही ना काही कारणांनी तुम्हीही मुलांचे सगळे हट्ट पुरवत असाल आणि त्यांनी काही मागितल्यावर लगेचच ती गोष्ट पुरवत असाल तर याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात समजून घ्यायलाच हवं. अशाप्रकारचे परमिसिव्ह पॅरेंटींग मुलांसाठी आणि पालकांसाठीही कसे चांगले नसते याबाबत त्यांनी काही गोष्टी नेमकेपणाने सांगितल्या आहेत, त्या कोणत्या पाहूया..
परमिसिव्ह पॅरेंटिंग म्हणजे काय आणि ते कसे घातक होत चालले आहे ते पाहू ?
मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण करणे, त्यांना नकाराची सवय न लावणे, ते मागत असलेल्या गोष्टीच्या आवश्यकतेचा विचार न करता मुलांना वस्तू पुरवणे अशाप्रकारच्या पालकत्वाला परमिसिव्ह पॅरेंटिंग म्हणतात. अशाप्रकारच्या पालकत्वामुळे मुले अधिकाधिक हट्टी होत जातात. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने होणे अपेक्षित असते. जर तसे नाही झाले तर ते आक्रस्ताळेपणा करतात. अशा मुलांना नियम, सीमा कळत नाहीत. विशेष म्हणजे जे पालक अशाप्रकारे मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण करतात त्यांना स्वयंशिस्त व भावनिक नियमन करण्यात अडचणी येतात. या मुलांना समाजात वावरणेही अवघड जाते. असे होऊ नये म्हणून प्रेम आणि लाड करतानाच मुलांना शिस्त आणि नियम यांचीही ओळख वेळीच करुन द्यायला हवी.
मुलांना शिस्त कशी लावावी ?
१. स्पष्ट सीमारेषा असाव्या…
मुलांसाठी काही साधे व सोपे नियम आखावेत. त्या नियमांशी पालकांनी घट्ट असावे. त्यामुळे मुलांना नियम, सीमा कळतात आणि त्यानुसार ते स्वतःला बदलतात.
२. संतुलित शिस्त शिकवा…
शिस्तीच्या बाबतीत कठोर नाही पण प्रेमळ तरीही दृढ राहत नियमांचे पालन करत त्यामागचे उद्देश स्पष्टपणे समजावून सांगावेत. त्याचा मुलांच्या विकासासाठी नक्कीच फायदा होतो.
३. आत्मनिर्भर होण्यावर भर द्या…
मुलांना त्यांच्या जबाबदार्या पार पाडू द्या. त्याचे परिणाम काय होतात ते त्यांना शिकू द्या.
४. भावनांवर नियंत्रण शिकवा…
मुलांना त्यांच्या भावना ओळखण्यास आणि त्यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यास मदत करायला हवी, यामुळे मुलांमध्ये नकळत शांत राहण्याची वृत्ती निर्माण होईल.
५. समस्या सोडवण्यास प्रोत्साहन द्या…
मुलांना त्यांच्यासमोर येणार्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी, जबाबदारी घेण्यासाठी प्रोत्साहित करा.
६. स्क्रीन टाइम कमी करा…
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांना खेळ, वाचन अशा गोष्टींमध्ये रमवा, जेणेकरुन त्यांचा स्क्रीन टाइम कमी होईल. स्क्रीन टाइमबाबतची सीमारेषा स्पष्ट असायला हवी म्हणजे त्याचा त्रास होणार नाही.