Indigestion And Its Remedies 25

Indigestion and its remedies

A disorder caused by improper digestion of food is called ‘Indigestion’.

  • A disorder caused by improper digestion of food is called ‘Indigestion’. Symptoms of indigestion are varied and related to food.
    All the symptoms from bloating to stomach pain are called ‘indigestion’.
    Digestion of food starts from the mouth. Once the food is chewed, it becomes easier to process the vicars in the saliva. This food passes through the esophagus into the stomach, then into the small intestine and from there into the large intestine.
    Different organs process food in different parts and digest and absorb different components of food. Disruption of this normally functioning process leads to indigestion.
  • Indigestion causes pain or bloating in the stomach. When the intestine becomes bloated due to gas, the circular muscles in the intestine contract to push the gas forward. It causes stomach ache. If you burp at such a time, the acid from the stomach comes into the oesophagus. It causes heartburn. Stomach ache due to inflammation of esophagus and stomach.
  • Pain in the right upper part of the stomach in liver disorders, cholecystitis and gallstones.
    This pain increases especially after eating fatty foods. If the pain is on the left side, it may be pancreatitis.
    If the pain subsides after eating, gastritis or an ulcer or peptic ulcer may be the cause of the inflammation.
  • Some people may experience indigestion after eating spicy foods. E.g., stomach ache after eating eggplant, potato, some fish.
    Some individuals are born with a deficiency of a disorder. Some people cannot digest milk due to lactase deficiency.
  • Giardiasis is a disease caused by the protozoan Giardia lamblia, which causes excessive gas retention in the stomach.
    Especially after eating carbohydrates and sweet foods, their fermentation takes place. Stomach distends, rumbles, stool is thin, Apana Vayu passes but has no bad smell.
  • Some people have a habit of swallowing air. Stress and hasty eating also lead to gas in the stomach and belching.
  • Faeces and stomach acid are examined to diagnose indigestion. This examination of the inside (gastroscopy) is done with a telescope.
  • Indigestion problem is solved by following certain diet regimen. Eat slowly and calmly if possible. Eat food well.
    Eat less spicy and spicy foods. Avoid overeating. Eat a little at a time, often.
    Digestive fruits like papaya should be eaten after meals. Do not sleep for an hour after eating. Medical treatment should be given if necessary.
Indigestion and its remedies

अपचन (Indigestion) व त्यावरील उपाय :-

अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्‍या विकाराला ‘अपचन’ म्हणतात.

  • अन्नाचे पचन नीट न झाल्याने निर्माण होणार्‍या विकाराला ‘अपचन’ म्हणतात. अपचनाची लक्षणे निरनिराळ्या प्रकारची असून खाण्याशी निगडित असतात. पोट फुगण्यापासून पोट दुखण्यापर्यंत सर्व लक्षणांना ‘अपचन’ असे म्हणतात.

  • अन्नाच्या पचनाला तोंडापासून सुरुवात होते. अन्न चावून खाल्ले की लाळेतील विकरांची प्रक्रिया होणे सोपे होते. हे अन्न अन्ननलिकेद्वारा जठरात, नंतर लहान आतड्यात व तेथून मोठ्या आतड्यात जाते.
  • निरनिराळ्या भागांत निरनिराळे विकर अन्नावर प्रक्रिया करतात व अन्नातील निरनिराळ्या घटकांचे पचन व शोषण होते. या सामान्यपणे चालणार्‍या प्रक्रियेत व्यत्यय आला तर अपचन होते.
  • अपचनामुळे पोटात दुखते अथवा कळ येते. वायूमुळे आतडी फुगल्यावर वायू पुढे ढकलण्यासाठी आतड्यातील गोलाकार स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे पोट दुखते. अशा वेळी ढेकर आल्यास जठरातील आम्ल अन्ननलिकेत येते. त्यामुळे छातीत जळजळते. अन्ननलिकेच्या व जठराच्या दाहामुळे पोट दुखते.
  • यकृताच्या विकारात, पित्ताशयाच्या दाहात व पित्ताश्मरीत पोटाच्या वरच्या भागात उजव्या बाजूस दुखते. विशेषतः स्निग्ध पदार्थ खाल्ल्यावर हे दुखणे वाढते.
  • डाव्या बाजूस दुखले तर स्वादुपिंडाचा दाह असू शकतो. जेवल्यावर दुखणे कमी झाले तर जठराचा दाह किंवा व्रण किंवा आद्यांत्राचा व्रण दाहास कारणीभूत असू शकतो.
  • काही जणांना वावडे पदार्थ खाल्ल्यास अपचन होऊ शकते. उदा., वांगी, अळू, काही मासे हे पदार्थ खाल्ल्यावर पोट दुखू लागते. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच एखाद्या विकराची न्यूनता असते. लॅक्टेज या विकराच्या न्यूनतेमुळे काही व्यक्तींना दूध पचत नाही.
  • गियार्डियासिस या रोगात गियार्डिया लॅम्बलिया या आदिजीवामुळे पोटात खूप वायू धरतो. विशेषत: कर्बोदके व गोड पदार्थ खाल्ल्यावर त्यांचे किणवन किण्वन होतें.
  • पोट फुगते,गुरगुरते,शौचास पातळ होते,अपान वायू सरकतो पण त्यास दुर्गंधी नसते.
  • काही लोकांना हवा गिळण्याची सवय असते. मानसिक ताण व घाईघाईने खाणे यामुळेदेखील हवा जठरात जाते आणि ढेकर येतात.
  • अपचनाचे निदान करण्यासाठी विष्ठा व जठरातील आम्ल यांची तपासणी करतात. दुर्बिणीने आतील भागाची ही तपासणी (गॅस्ट्रोस्कोपी)करतात.
  • अन्नसेवनाची काही पथ्ये पाळल्यास अपचनाची समस्या दूर होते. शक्यतो शांतपणे व सावकाश जेवावे. अन्न नीट चावून खावे. अतितिखट व मसाल्याचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत.
  • अती खाणे वर्ज्य करावे. एका वेळी थोडे, असे बरेच वेळा खावे. जेवणानंतर पपईसारखी पाचक फळे खावीत. जेवणानंतर तासभर झोपू नये. आवश्यक वाटल्यास वैद्यकिय उपचार करावेत.

Leave a Comment