In view of the growing trend of artificial sweeteners under the name of ‘Sugar Free’, not only types of sweets but also many drinks and foods are being sold under the name of Sugar Free. You may be surprised to learn that eating sugar free for the purpose of maintaining good health can make you very sick, not sick.
Many people avoid sugar for fear of developing diabetes. Some people stop eating sugar because the calories in sugar increase their obesity.
Whatever the reason, the case is fine as long as you decide not to eat sugar. However, when we cannot control our tongue and start taking artificial sweeteners in the name of ‘sugar free’ instead of sugar, then a different problem starts.
Dieticians say that long-term use of sugar-free products in the market can be harmful. Actually, the artificial sweetener ‘aspartame’ is being sold in the market under the name of sugar free. Aspartame is about 200 times sweeter than regular sugar.
The irony here is that this chemical called aspartame can turn into a toxic substance at high temperatures, and we use it for strong-hot tea.
Long-term consumption of sugar-free products can have negative effects on mental health. Apart from this, the problem of headache, stress, increased heart rate is seen in those who use sugar free continuously.
Dietitian-nutritionists say that in some international studies, 92 types of side effects have been observed in people who use sugar free products for a long time.
The increased consumption of sugar free products has led to many problems especially eye, ear, head, gastrointestinal, mental disorders, skin disorders among others.
Another study about this by American nutritionist Dr. By Dr. Janet Starr Hull. Dr. According to Janet, continuous use of aspartame causes about 92 types of side effects in all parts of the body, which can make a person very sick.
He said that since aspartame is used in drinks such as tea or coke, it reaches all parts of the body very easily and accumulates in the tissues, and over time its side effects begin to appear in the body.
Dietitian-Nutritionists say that it is beyond comprehension why non-diabetics consume sugar free. If you’re trying to prevent diabetes or obesity, cut back on sweets.
All artificial sweeteners available as sweeteners are harmful to the body in one way or another.
It has been seen many times that many people eat sugar free to avoid obesity. However, later it was found that his obesity increased due to sugar free, dietician-nutritionist also says.
साखर खाण्यापेक्षाही धोकादायक आहे शुगर फ्रीचं सेवन, आहेत तब्बल ९२ प्रकारचे धोके…:-
‘शुगर फ्री’च्या (Sugar Free) नावाखाली कृत्रिम स्वीटनरचा वाढता ट्रेंड पाहता मिठाईचे प्रकारच नव्हे तर अनेक पेये आणि खाद्यपदार्थही शुगर फ्रीच्या नावाखाली विकले जावू लागले आहेत. तुम्हाला हे समजल्यानंतर आश्चर्य वाटेल की, आरोग्य चांगले राखण्याच्या उद्देशाने शुगर फ्री खाण्याच्या नादात तुम्ही आजारी नव्हे खूप आजारी पडू शकता.
मधुमेह होऊ शकतो या भीतीने बरेच लोक साखर खाणं सोडून देतात. काही लोक साखर खाणं, यासाठी बंद करतात कारण साखरेमध्ये असलेल्या कॅलरीजमुळे त्यांचा लठ्ठपणा वाढत जातो.
कारण काहीही असो, साखर न खाण्याचा निर्णय होईपर्यंत प्रकरण ठीक आहे. मात्र, जेव्हा आपण आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून साखरेऐवजी ‘शुगर फ्री’च्या नावाखाली कृत्रिम स्वीटनर (Artificial sweeteners) घेण्यास सुरुवात करतो तेव्हा वेगळीच समस्या सुरू होते.
डायटीशियन सांगतात की, बाजारातील शुगर फ्री पदार्थांचा दीर्घकाळ वापर करणं हानिकारक ठरू शकतं. वास्तविक, शुगर फ्रीच्या नावाखाली कृत्रिम स्वीटनर ‘अस्पार्टम’ बाजारात विकले जात आहे. Aspartame सामान्य साखरेपेक्षा सुमारे २०० पट गोड आहे.
येथे गंमत अशी आहे की, एस्पार्टम नावाच्या या रसायनाचे उच्च तापमानात विषारी घटकात रुपांतर होऊ शकते आणि आपण कडक-गरम चहासाठी त्याचा वापर करतो
दीर्घकाळ शुगर फ्री गोष्टींचा वापर केल्यास मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. याशिवाय शुगर फ्रीचा सतत वापर करणाऱ्यांमध्ये डोकेदुखी, स्ट्रेस, हृदयाचे ठोके वाढण्याची समस्या दिसून येत आहे.
आहारतज्ज्ञ-न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या काही अभ्यासांमध्ये, जे लोक दीर्घकाळ शुगर फ्री गोष्टींचा वापर करतात त्यांच्यामध्ये ९२ प्रकारचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत.
शुगर फ्री गोष्टींचा वापर वाढल्याने विशेषत: डोळे, कान, डोकं, गैस्ट्रोइंटेस्टाइनल, मानसिक विकार, त्वचा विकारांसह इतर अनेक समस्या दिसून आल्या आहेत.
याविषयीचा आणखी एक अभ्यास अमेरिकन पोषणतज्ञ डॉ. जेनेट स्टार हल (Dr. Janet Starr Hull) यांचा आहे. डॉ. जेनेट यांच्या मते, aspartame च्या सतत वापरामुळे शरीराच्या सर्व भागांमध्ये सुमारे ९२ प्रकारचे दुष्परिणाम होतात, ज्यामुळे व्यक्ती खूप आजारी पडू शकतो.
त्यांनी सांगितले की aspartame हे चहा किंवा कोकसारख्या पेयांमध्ये वापरले जात असल्याने ते शरीराच्या सर्व भागांमध्ये अगदी सहजतेने पोहोचते आणि ऊतकांमध्ये जमा होते आणि कालांतराने त्याचे दुष्परिणाम शरीरात दिसू लागतात.
आहारतज्ज्ञ-न्युट्रिशनिस्ट सांगतात की, ज्यांना मधुमेह नाही ते शुगर फ्री का वापरतात हे समजण्यापलीकडचे आहे. जर तुम्ही मधुमेह किंवा लठ्ठपणा टाळण्यासाठी प्रयत्न करत असाल तर गोड खाणंच बंद करा.
गोडपणाला पर्याय म्हणून उपलब्ध असलेले सर्व कृत्रिम गोड पदार्थ शरीराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हानिकारकच आहेत.
लठ्ठपणा वाढू नये, यासाठी कित्येक लोक शुगर फ्री खातात असं अनेकवेळा पाहण्यात आलंय. मात्र, नंतर शुगर फ्रीमुळेच त्याचा लठ्ठपणा वाढल्याचं दिसून आलं, असेही आहारतज्ज्ञ-न्युट्रिशनिस्ट सांगतात.