Sleep 7 Benefits of Getting a Restful and Adequate Amount of Sleep…

7 Benefits of Getting a Restful and Adequate Amount of Sleep…

According to Ayurveda, six hours of sleep is sufficient for a normal, healthy person.

Sleep, a natural and necessary part of our daily routine, provides us with energy, which is essential for good health. Adequate, deep sleep provides our body and mind with adequate rest, leaving us feeling refreshed, happy, and energetic.

To get good sleep, eat light and digestible food at night. While sleeping, the head should be in the east or south direction. Sleeping with the head in the north direction reduces vitality. While sleeping, sleep on the left side.

The consequences of insomnia…

Insomnia causes body pain, headache, body aches, indigestion and rheumatic diseases. Therefore, it is necessary to get proper sleep. Insufficient sleep (less than required or improper) causes diseases like sadness, weakness, lethargy, and short life. Now let us learn about sleep in detail.

According to Ayurveda, six hours of sleep is sufficient for a normal, healthy person. Therefore, people with pitta and kapha karak nature will remain healthy if they make a habit of sleeping for six hours.

7 Benefits of Getting a Restful and Adequate Amount of Sleep as follows :-

  • Getting good sleep helps to keep the hormone levels in our body in order, which increases our enthusiasm and energy.
  • If you get proper sleep, a major disease like obesity will not come near you.
  • Surveys have revealed that people who sleep less are more likely to get sick.
  • Facial blemishes are reduced…
    The effects of sleeping early start to appear on the face. Pimples on the face start to reduce. And dark spots start to gradually reduce.
  • Appetite improves…
    Sufficient sleep makes you feel good. You feel like eating healthy foods.
  • Efficiency increases…
    By getting 8 hours of adequate and restful sleep, you can work more quickly. And your efficiency increases.
  • In this way, getting proper, proper and timely sleep keeps your health healthy. That is why along with food, exercise, and yoga, sleep also has an important place in our life.
Benefits of Getting a Restful and Adequate Amount of Sleep…

आयुर्वेदानुसार एक सामान्य, निरोगी व्यक्तीस सहा तासांची झोप पुरेशी आहे.

रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते.

चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा. झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे उत्तरेकडे डोके करून झोपल्यास जिवनशक्तीचा ह्रास होतो. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे.

आयुर्वेदानुसार एक सामान्य, निरोगी व्यक्तीस सहा तासांची झोप पुरेशी आहे. म्हणूनच पित्त आणि कफ कारक प्रकृतीच्या लोकांनी सहा तासांच्या झोपेची सवय करून घेतल्यास ते निरोगी राहतील.

निद्रानाशाचे परिणाम…

निद्रानाशामुळे शरीरात वेदना होणे, डोके जड पडणे, शरीर जड पडणे, अपचन होणे तसेच वातजन्य रोग जडतात. त्यामुळे योग्य निद्रा घेणे आवश्यक आहे. अपुरी झोप (गरजेपेक्षा कमी किंवा अयोग्य ) ही दुःख, अशक्तपणा, सुस्ती, अल्पायुष्य अशा व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. आता आपण निद्रे बद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

शांत आणि योग्य प्रमाणात झोप घेण्याचे 7 फायदे…

  • चांगली झोप घेतली तर आपल्या शरीरातील हार्मोन्स ची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते, त्यामुळे आपला उत्साह व स्फूर्ती वाढते.
  • व्यवस्थित झोप घेतली तर लठ्ठपणासारखा मोठा आजार आपल्या जवळ ही येणार नाही.
  • सर्वेक्षणामध्ये असे समोर आले आहे की जे लोक कमी झोप घेतात त्यांची आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
  • चेहऱ्यावरील डाग कमी होतात…
    लवकर झोपण्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊ लागतात. आणि काळे डाग हळूहळू कमी व्हायला लागतात.
  • भूकेत सुधारणा होते…
    पुरेशी झोप झाल्यास चांगली भूक लागते. हेल्दी पदार्थ खावेसे वाटतात.
  • कार्यक्षमतेत वाढ होते…
    ८ तास पुरेशी आणि शांत झोप घेतल्यामुळे अधिक तत्परतेने काम करू शकता. व आपली कार्यक्षमता वाढते.
  • अशा प्रकारे योग्य, व्यवस्थित व वेळेवर झोप घेतल्यास आपले आरोग्य निरोगी राहते. म्हणूनच तर जेवण, व्यायाम, योगासने या बरोबरच झोपेलाही आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे.

Leave a Comment