Does eating rice really increase weight? Just keep in mind the following while eating rice…
Many people give up eating rice to lose weight, while others eat brown rice. There are many differences among people regarding rice and weight gain. Let’s learn more about how to cook rice for weight loss, what type of rice to include in the diet.
What kind of rice to eat to control weight?
Rice is a major staple in the Indian diet. Rice is consumed in the daily diet in almost all households across the country. Despite this, rice is criticized that eating too much rice leads to weight gain. It doesn’t really matter what type of rice you use as long as rice is eaten in the right amount in each meal and the rest of the plate is balanced. But if you still have to choose, it is advisable to use minimally processed or unpolished rice.
The less processed the rice, the higher the fiber content, and thus helping to keep the stomach full even with less rice and help in weight control. Brown rice, red rice, black rice are some of the options that are unpolished and have high fiber content.
The amount of rice in a plate and whether the other ingredients in the plate are balanced are more important than the type of rice for weight control.
What type of rice should be avoided?
If rice is included in a balanced diet and its quantity is controlled, there is no need to avoid eating rice at all, but if you still want to avoid eating rice, you should avoid eating polished rice. Any type of rice will do, but it is best for health if it is in its natural form.
In the era of fad diets, alternatives like cauliflower rice or broccoli rice are becoming more common. They are lower in carbohydrates than conventional rice, but these rices are also highly processed, making these alternatives unhealthy.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कोणता भात खावा ?
वजन कमी करण्यसाठी अनेकजण भात खाणं सोडतात, तर काहीजण ब्राऊन राईस खातात. भात आणि वजनवाढ याबाबत लोकांमध्ये अनेक भेद मतभेद आहेत. वजन कमी करण्यासाठी भात कसा शिजवायचा, कोणत्या प्रकारच्या भाताचा आहारात समावेश करावा याबाबत अधिक माहिती घेऊयात.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचा तांदूळ खावा ?
भारतीय आहारातील एक प्रमुख पदार्थ आहे भात. देशभरातील जवळपास सर्व घरांमध्ये रोजच्या आहारात भात खाल्ला जातो. असे असून देखील खूप जास्त भात खाल्ल्याने वजन वाढते अशी टीका तांदुळावर केली जाते. प्रत्येक आहारामध्ये भात योग्य प्रमाणात खाल्ला जात असेल आणि ताटातील उर्वरित पदार्थ संतुलित असतील तर तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरता याने फारसा फरक पडत नाही. पण तरीही निवड करायचीच असेल तर, कमीत कमी प्रक्रिया केलेला किंवा अनपॉलिश्ड तांदूळ वापरणे हितावह आहे.
तांदुळावर प्रक्रिया जितक्या कमी केलेल्या असतील, तितके त्यामधील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे कमी भात खाऊन देखील पोट भरते व वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते. ब्राऊन राईस, लाल तांदूळ, काळा तांदूळ हे असे काही पर्याय आहेत जे अनपॉलिश्ड असतात आणि त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे यापेक्षा ताटामधील भाताचे प्रमाण व ताटातील इतर पदार्थ संतुलित आहेत की नाही याला जास्त महत्त्व असते.
कोणत्या प्रकारचा तांदूळ खाणे टाळावे ?
संतुलित आहारामध्ये जर भाताचा समावेश असेल आणि त्याचे प्रमाण नियंत्रणात असेल तर भात खाणे टाळण्याची अजिबात गरज नाही, पण तरीही जर भात खाणे टाळायचे असेल तर पॉलिश्ड तांदूळ खाणे टाळावे. तांदुळाचा प्रकार कोणताही असला तरी चालेल, पण तो जास्तीत जास्त नैसर्गिक स्वरूपात असेल तर तब्येतीसाठी चांगला असतो.
फॅड डाएट्सचा जमाना आहे, कॉलीफ्लॉवर राईस किंवा ब्रोकोली राईस असे पर्याय मोठ्या प्रमाणावर येत आहेत. पारंपरिक तांदुळापेक्षा त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते, पण या तांदुळांवर देखील खूप जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेली असते त्यामुळे हे पर्याय आरोग्यास हानिकारक आहेत.