Never Get Angry over Food…

Lifting the plate, getting up, throwing the plate is very bad.

प्लेट उठाना, उठना, प्लेट फेंकना बहुत बुरा है।

ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते.

  • Lifting the plate, getting up, throwing the plate is very bad. Some mistakes happen unknowingly, but their consequences are annoying. One of the biggest household mistakes is dishonoring food. As soon as a person sits down to eat, the house begins to rustle. Spouse, wife, children or any of the guests suddenly bring up unwanted topics. Word by word increases. Quarrels start and someone leaves the meal in anger. Food remains the same. Anna is an insult to Annapurna. Later the family begins to descend.
  • Do not mention any problems in the house when the housekeeper, man or woman, is sitting down to eat. Let them eat four grains in peace. Even if the enemy is eating and drinking, if he is eating, let him eat happily. Don’t say anything. Whether the person who gets angry from food or someone who forces him to do so, both are cursed by food.
  • Due to poverty, some people try to steal bread, bread, vada, samosa or ladoos etc. and end up getting beaten up by the mob. Cats and similar animals sometimes steal and drink away, so some people kill them. Or pushed away. Even if it is right not to steal, what will those dumb animals understand? To remove the grass from one’s mouth invites a curse. Don’t do that.
    If there are differences etc., you can talk about it later, but when there is food in front of you, you should not accidentally use abusive language. Also do not give any advice to anyone. Be it home or hotel, wedding, munji event or any ceremony, if people eat food with calm mind then it is a blessing and if they somehow push four ghaas in the stomach in anger, it is an insult to Annapurna and soon its adverse effects will be felt. For this purpose, Chitrahuti is offered by swirling water around the plate before eating and it is customary to keep some of the shita for a known unknown soul. Rangoli is drawn around the plate during mangalkarya. May Goddess Annapurna be pleased. The intention behind it is that the entire family should be protected, the house should be filled with wealth, and everyone should prosper.
  • Whether it is a person who cooks or grows food or provides food in a hotel, his good and bad thoughts enter the food in his hand, therefore, if the mind is not calm or if the mind is angry, angry and agitated, one should not eat or drink.
  • Human being eats food for stomach but if you don’t eat that food calmly then what is the use of eating it if spoilage of food insults Annapurna then it causes many defects and it becomes troublesome further. Astrology says that panchamahayagya should be done daily to remove these defects. The saying ‘atithi devo bhava’ is also used for this. Feeding crows, sparrows, pigeons, dogs, cats, cows and other dumb animals will boost your earnings. God is protecting us in someone’s form when the signs come. Accidents do not happen and even if they do happen, they get out of it safely. By donating food, many doshas are destroyed, the house also remains peaceful. One’s own spiritual power also increases.
Never Get Angry over Food

अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो…

ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते.

🌸 ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते.

🌸 घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो.

🌸 गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार ? एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते. त्यासाठी असे प्रकार करू नका.

🌸 मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहुती दिली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो.

🌸 अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये.

🌸 मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. ‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची अध्यात्मिक शक्तीही वाढते.

अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो...

Leave a Comment