इर्रिटेबल बाउल सिंड्रोम हा आतड्यांचा सिंड्रोम आहे…
Irritable bowel syndrome is a bowel syndrome…
Complaints such as stomach ache and feeling uneasiness come up in this. Irritable bowel syndrome can cause your food to move faster through the colon. This causes you to constantly go to the toilet.
Why do you have to go to the washroom immediately after eating?
There are two types of people in the world who fall asleep immediately after eating and the other who are in a hurry to go to the washroom after eating. If you belong to the first category then you have no reason to worry. But if you find yourself constantly going to the washroom, it’s time to pay attention to your health.
According to experts, the habit of going to the washroom at untimely times can get you into a lot of trouble later on. So it is important to understand why it is time to go to the washroom immediately after eating.
Diet :-
The habit of going to the toilet depends on your diet. Constantly eating spicy food and eating raw salad may make you have to go to the toilet. A high fiber intake can lead to loose motion problems.
Food allergies :-
Some people are allergic to certain foods. Allergies do not digest these foods, resulting in frequent trips to the washroom. These include fish, nuts, eggs.
इर्रिटेबल बाउल सिंड्रोम हा आतड्यांचा सिंड्रोम आहे.
यामध्ये पोटदुखी, बैचन वाटणं अशा तक्रारी समोर येतात. इर्रिटेबल बाउल सिंड्रोममुळे कोलोनद्वारे तुमच्या खाण्याची गती वाढू शकते. यामुळे तुम्हाला सतत टॉयलेटमध्ये जाण्याची वेळ येते.
खाल्ल्या-खाल्या लगेच वॉशरूम ला का जावं लागत ?
जगात अशी दोन पद्धतीची लोकं असतात ज्यांना जेवल्यानंतर लगेच झोप येते तर दुसरे म्हणजे खाल्ल्यानंतर वॉशरूमला जाण्याची घाई असते. जर तुम्ही पहिल्या श्रेणीत येत असाल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. मात्र जर तुम्हाला सतत वॉशरूमला जाण्याची वेळ येत असेल तर ही तुमच्या आरोग्यावर लक्ष देण्याची वेळ आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अवेळी वॉशरूममध्ये जाण्याची सवय तुम्हाला पुढे जाऊन अनेक अडचणीत आणू शकते. त्यामुळे खाल्ल्यानंतर तातडीने वॉशरूमला जाण्याची वेळ का येते हे समजून घेणं गरजेचं आहे.
आहार :-
टॉयलेटला जाण्याची सवय ही तुमच्या आहारावर अवलंबून असते. सतत मसालेदार खाणं आणि कच्च सलाड खाल्ल्याने तुम्हाला टॉयलेटला जावं लागण्याची शक्यता असते. तर अधिक फायबरयुक्त सेवनाने लूज मोशनची समस्या उद्भवू शकते.
खाण्यामुळे एलर्जी :-
काही लोकांना विशिष्ठ खाद्यपदार्थांची एलर्जी असते. एलर्जीमुळे हे पदार्थ पचत नाहीत परिणामी तुम्हाला सतत वॉशरूमला जाण्याची समस्या येऊ शकते. यामध्ये मासे, नट्स, अंड यांचा समावेश आहे.