10 Best Health Benefits of Eating Bananas

Health Benefits of Eating Bananas केळी Banana is a complete food. We can eat banana with or after food.

Health Benefits of Eating Bananas
  • Start the day with a banana. No tea, coffee, tobacco, bidi.
  • Banana saves us from acidity, headache, indigestion and bloating that bothers us during the day.
  • Bananas are basically ‘prebiotics’ that protect our gut health. Troubles caused by eating too much snacks on Diwali day, e.g. Saves from indigestion, acidity. So have a snack but don’t forget the banana.
  • Banana is a boon for those suffering from diabetes. Diabetics are always hit with apples. Bananas have the same sugar that is in apples. It is called ‘fructose’. This fructose helps in controlling blood sugar.
    Bananas have also been endorsed by the American Diabetes Association.
  • Banana is a complete food. We can eat banana with or after food.
  • During important and very tiring work days like ‘Bandobast’, banana protects us from dehydration and leg cramps, which are caused by standing for long periods of time.
  • Minerals in bananas help regulate heart rate. So people suffering from heart disease should eat banana.
  • Banana is not only good for the stomach but also for the pocket. Which will not suit the apple.
  • Starting the day with a banana helps reduce the excess of tea that occurs later in the day.

Some of the issues faced by eating Bananas…

1) Bananas are full of chemicals, so how to eat them?

Bananas that grow around us. By consuming those bananas, it is possible to overcome this problem. E.g. Cardamom Banana, Royal Banana, Green Peel Banana. So encourage your regular grocer to bring you green-peeled bananas.

2) Does eating banana cause weight gain?

Our body constantly needs calories i.e. energy. When we get this energy from the fruits growing around us. Then the body utilizes this energy completely and optimally. And does not allow it to be converted into fat. Seasonal fruits available around us- Banana, Mango, Chiku, Guava, Grapes, Sitafal, Fanas etc.

3) How many bananas can we eat in a day?

Only your stomach can give you the real answer to this question. Start the day with a banana. But bananas can be eaten at any time of the day. When you are hungry, instead of eating only tea + biscuits or just drinking tea or working on an empty stomach, you can definitely overcome the problems of headache, acidity and indigestion.

10 Best Health Benefits of Eating Bananas

केळी खाण्याचे १० आरोग्यदायी फायदे…

केळ हे पूर्ण अन्न आहे. केळ आपण जेवणाबरोबर किंवा नंतरही खाऊ शकतो.

  • दिवसाची सुरूवात केळ्याने करा. चहा, काॅफी, तंबाखू, बिडीने नाही.
  • दिवसभरात त्रास देणारी ॲसिडिटी, डोकेदुखी, अपचन व ब्लोटिंगपासून आपल्याला केळं वाचवतं.
  • केळं हे मुळात ‘प्रिबायोटिक’ असल्यामुळे आपल्या आतड्याच्या स्वास्थ्याला जपते. दिवाळीच्या दिवसात फराळाचे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे होणारे त्रास, उदा. अपचन, ॲसिडिटी यांच्यापासून वाचवते. तेव्हा फराळ कराच पण केळं विसरू नका.
  • मधुमेहाने त्रस्त असलेल्यांसाठी केळं हे एक वरदान आहे. मधुमेहींवर नेहमीच सफरचंदांचा मारा केला जातो. जी साखर सफरचंदात आहे तीच केळ्यातही आहे. तिला ‘फ्रुक्टोज’ म्हणतात. ही फ्रुक्टोज रक्तातील साखर आटोक्यात आणण्यास मदत करते.
    American Diabetes Association ने सुध्दा केळ्याला मान्यता दिली आहे.
  • केळ हे पूर्ण अन्न आहे. केळ आपण जेवणाबरोबर किंवा नंतरही खाऊ शकतो.
  • ‘बंदोबस्त’ सारख्या महत्त्वाच्या आणि अतिशय थकवणाऱ्या कामाच्या दिवसांमध्ये केळं आपल्याला डिहायड्रेशन व पायांत गोळे येण्यापासून वाचवते, जो त्रास आपल्याला जास्त काळ उभे राहिल्याने होतो.
  • केळ्यात असलेला खनिजांचा साठा ( minerals) ह्रदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे ह्रदयविकाराने ग्रस्त असलेल्यांनी केळं खाल्लच पाहिजे.
  • केळं हे फक्त पोटालाच नाही तर खिशालाही जपणारे आहे. जे सफरचंदाला जमणार नाही.
  • दिवसाची सुरुवात केळ्याने केल्याने दिवस भरात होणारा चहाचा अतिरेक कमी होतो.

केली खाल्ल्यामुळे भेडसावणारे काही प्रश्न…

1) केळ्यांवर केमिकल्सचा मारा असतो, मग कसे खाणार?

आपल्या आसपास जी केळी होतात. त्या केळ्यांचे सेवन केल्यास ह्या समस्येवर मात करणे शक्य आहे. उदा. वेलची केळी, राजेळी केळी, हिरव्या सालीची केळी. तेव्हा आपल्या नेहमीच्या फळवाल्याला हिरव्या सालीची केळी आणायला प्रोत्साहित करा.

2) केळ खाल्ल्याने वजन वाढतं ?

आपल्या शरीराला कॅलरीज म्हणजे ऊर्जेची गरज सतत असते. ही ऊर्जा जेव्हा आपल्याला आपल्या आसपास पिकत असलेल्या फळांमधून मिळते. तेव्हा ह्या ऊर्जेचा शरीर पूर्णपणे व उत्तमरित्या उपयोग करते. आणि चरबीत रूपांतर होऊ देत नाही. आपल्या आसपास ऋतुमानानुसार मिळणारी फळे- केळं, आंबा, चिकू, पेरू, द्राक्षं, सीताफळ, फणस इ.

3) आपण दिवसभरात किती केळी खाऊ शकतो?

ह्या प्रश्नाचे खरे उत्तर फक्त आपले पोटच आपल्याला देऊ शकते. दिवसाची सुरुवात तर केळ्याने कराच. पण केळं दिवसभरात कधीही खाता येतात. भूक लागलेली असतांना वेळेच्या अभावी फक्त चहा + बिस्किट खाणं किंवा नुसता चहा पिणं किंवा रिकाम्या पोटी काम करणं या ऐवजी केळं खाल्लं तर डोकेदुखी, ॲसिडिटी, अपचन ह्या समस्यांवर नक्की मात करता येते.

Leave a Comment