Cough 20 Effective Remedies for Cough

Effective Remedies for Cough

Cough and dry cough and some effective remedies for it can be mentioned as follows…

  1. Turmeric mixed with milk cures cough. Boil two khariks and turmeric in milk and take after cooling. By doing this the phlegm loosens and comes out. Cough is cured.
  2. Taking ginger and honey together gives relief and cures cough.
  3. Garlic is hot in nature. It has antibacterial properties, garlic cloves should be fried in ghee and eaten hot, it soothes the throat and feels good.
  4. Mixing black pepper, nutmeg powder and honey gives quick benefits. Take two to three times a day.
  5. Pimpli knot is crushed and mixed with honey and taken as chatan cures cough.
  6. If the cough does not go away, mix a few drops of Eucalyptus oil with coconut oil and massage the chest with it, it loosens the phlegm and feels good.
  7. Licorice is a useful medicine. When you have a spasm of cough, chewing licorice sticks relieves the cough, or a mixture of licorice and honey and lick it gives relief.
  8. Both mint leaves and basil are useful for curing cough. Boil 10-15 mint leaves and 15-16 tulsi leaves in a glass of water, add a small jaggery stone and drink it hot. It loosens the phlegm and feels good.
  9. Cloves and honey When you have a cough, instead of eating only cloves and honey, if you lick them together throughout the day, you get relief. Many times it happens at night. No need to sleep. In such a case, if a spoonful of cumin powder + a spoonful of sunth powder are taken together, spasms will occur. Mix honey in it.
  10. In case of cold and cough, wash a handful of neem leaves and add a spoonful of oats to it and grind it finely and apply this paste on the ear canal. Infections will go away
  11. If the cough does not get better, four veldoda and an equal amount of sandalwood powder mixed with honey and taken as chatan gives relief.
  12. If there is only dry dhaas, fry two veldodas on tawa. If powdered and mixed with ghee and sugar and taken as chatan, it gives relief.
  13. If you have a similar cough or shortness of breath, boil a glass of water with a spoonful of coriander and a piece of licorice honey, strain it and cut it in half. Then take it warm. It gives relief.
  14. For cough, phlegm, cold, take vidya leaves twice a day.
  15. After cough, half spoon of Sunthi powder + Pimpli powder + Behda powder pav spoon mixed with one spoon of honey and taken as chatan gives relief.
  16. In case of cough, eat fennel and granulated sugar.
  17. Take a pinch of kathi powder and drink hot water over it. Feels good.
  18. If blood comes from coughing, take a bowl of wet coconut bread and add five or six raisins to it and eat it.
  19. Eat smooth betel nut after coughing.
  20. If the cough does not get better, take two spoonfuls of Tulsi leaf juice and add some granulated sugar to it. Take three, four times a day. Take three days like this.
  21. In case of dry cough, eat poppy seed pudding. Roast a handful of poppy seeds in ghee. Then cook it in milk and drink it hot. Add sugar as per your taste.
  22. After coughing whores, grind alum and take it warm. Then mix that water and keep that saucer in the sun. The water goes away. And pure alum remains. Mix one spoon of honey in it.
  23. Sesame oil should be warmed and drunk.
  24. One cupful of bakuli flowers + one cupful of sunflower flowers + two cupfuls of water should be taken and sugar added and should be taken daily.
  25. Steam adulsa leaves, extract its juice and add a little jaggery to make a cup of juice.
  26. Boil four cloves of garlic in one cup of milk.
  27. Chew elder honey + granulated sugar.
  28. Roast aloe vera leaves. Extract their juice. Take one spoon of juice and mix it with honey.
  29. Bhimsen camphor mixed with one spoon of sugar and taken as chatan gives relief.
  30. In case of cough, crush and heat basil leaves and rub the chest with this potty.
20 Effective Remedies for Cough

खोकला तसेच कोरडा खोकला व त्यावरील काही प्रभावी उपाय खालील प्रमाणे सांगता येतील…

  1. हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारीक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. असे केल्याने कफ मोकळा होतो व बाहेर पडतो. खोकला बरा होतो.
  2. आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो.
  3. लसुण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात ॲन्टीबॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात, याने गळ्याला शेक बसतो व बरं वाटतं.
  4. काळे मिरे, जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो. दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
  5. पिंपळी गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो.
  6. खोकला बरा होत नसेल, तर नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून मग याने छातीला मालिश करा, याने कफ मोकळा होतो व बरं वाटते.
  7. ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे. खोकल्याची उबळ आली की, ज्येष्ठमध काडी चघळल्यास ढास जाते, बरं वाटते, किंवा ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
  8. पुदिना पाने व तुळस या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहेत. १०-१५ पुदिन्याची पाने व १५-१६ तुळशी ची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले की एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम प्यावे. याने कफ मोकळा होतो व बरं वाटतं.
  9. लवंग व मध खोकला आल्यावर नुसती लवंग व मध खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो. बरेच वेळा रात्री ढास लागते. झोप लागत नाही. अशा वेळी पाव चमचा जिरेपूड + पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते. मध मिसळून द्यावे त्यात.
  10. सर्दी व खोकला झाल्यास मूठभर कडुनिंब पाने धूवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा. संक्रमण दूर होतील
  11. खोकला बरा होत नसेल, तर चार वेलदोडे व तितकीच सुंठ पावडर एकत्र करून मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
  12. नुसती कोरडी ढास लागली असेल, तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या. पावडर करून त्यात तुप व साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
  13. सारखा खोकला येत असेल, किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे, आटवून अर्धा करा. मग कोमट करून घ्या. याने आराम मिळतो.
  14. खोकला, कफ, सर्दी वर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे.
  15. खोकल्यावर सुंठीची पावडर अर्धा चमचा + पिंपळी चूर्ण + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
  16. खोकला झाल्यास बडीशेप व खडीसाखर खावी.
  17. एक चिमूटभर काताची पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. बरं वाटते.
  18. खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाच, सहा मनुका घालून खावे.
  19. खोकला आल्यावर चिकणी सुपारी खावी.
  20. खोकला बरा होत नसेल, तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून घ्यावे. दिवसातून तीन, चार वेळा घ्यावे. असे तीन दिवस घ्यावे.
  21. कोरडा खोकला झाल्यास खसखशीची खीर खावी. मुठभर खसखस तुपात भाजून घ्या. मग दूधामध्ये शिजवून घ्या व गरम गरम प्या. साखर आवडीनुसार मिसळून घ्यावे.
  22. डांग्या खोकल्यावर तुरटी कुटून गरम करून घ्या. मग त्या त्या पाणी मिसळून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून जाते. व शुद्ध तुरटी शिल्लक राहते. त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावे.
  23. तिळाचे तेल कोमट करून प्यावे.
  24. बकुळीची फुले ओंजळभर + सोनचाफ्याची ओंजळभर फुले + दोन तांबे पाणी घेऊन साखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्या.
  25. अडुळसा पाने वाफेवर उकडून, त्याचा रस काढून घ्यावा व थोडा गूळ घालून पाव कप रस घ्यावा.
  26. एक कप दूधामध्ये लसणाच्या चार पाकळ्या उकळून घ्यावे.
  27. ज्येष्ठ मध + खडीसाखर चघळावी.
  28. कोरफडीची पाने भाजून घ्या. त्यांचा रस काढून घ्यावा. एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे.
  29. भिमसेन कापूर व एक चमचा साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
  30. खोकला झाल्यास तुळशीची पाने ठेचून व गरम करून या पोटीसने छाती शेकावी.
खोकला

Leave a Comment