Rabies A Disease Caused By The Bite Of Dogs Infected With The Rabies Virus 25

A disease caused by the bite of dogs infected with the rabies virus...

Rabies is a disease caused by a type of virus.

  • Rabies is a disease caused by a type of virus. These viruses cause similar disease in rodents (ie dogs, foxes, cats, wolves, etc.). The spread of this disease in the forest is through stray dogs in human settlements.
  • Rabies is impossible to survive once. That is why people feel an extraordinary fear when bitten by dogs. Humans can get rabies from an infected dog or animal. That is why even though there are many cases of dog bites, only one of them is a real danger. Millions of dog bite incidents occur in India every year. About 50 thousand of them die. This is the sad truth. How Rabies Disease Occurs Infection occurs when infected saliva is spilled on any wound. The rabies virus cannot enter if the skin is broken.
  • The rabies virus spreads through the nerves. These viruses are present in the saliva of a dog (or animal) with distemper. After the virus enters the saliva, the animal usually dies within ten days.
  • After a dog bite, the rabies virus spreads through the wound. Then they attack the nerve fibers and enter the brain through them. (They are not spread through the bloodstream). After entering the brain, the brain slowly swells and the brain fails. Slowly the patient goes to bed.
  • Even the simple act of drinking water becomes very painful. Rabies virus is present in large numbers in the saliva, tears and urine of infected patients. However, so far there has not been a single case of infection of the patient to a close person or a doctor-nurse.
  • 25,000-50,000 deaths are due to pox every year in India, yet it is remarkable that such an incident has not occurred.
  • The virus increases in number in the muscles at the bite site. Along with the fluid from the nerve fibers, they enter the spinal cord. They also cause some inflammation in this place. This inflammation causes strange sensations and deafness in the place from where the virus originated. After this, they increase in number through the nerve and spread through the cells. Moreover, they also enter the cerebrospinal fluid. From there it is easy for them to spread throughout the brain. After this, they descend from the brain to the salivary glands through nerve fibers. By that time, the person is completely consumed by Pisali. In this way, the virus completes a life cycle from another person’s saliva to a person’s wound, from there to the brain, from there to the person’s saliva.
  • But in man they end in a way. From humans they can hardly infect other animals or humans. It is the natural tendency of every organism to multiply itself. In humans, the rabies virus multiplies but the way forward is closed to them. But in animals their journey and descent continues.
रेबीज हा एका प्रकारच्या विषाणूमुळे होणारा आजार आहे.

रेबीज हा एका प्रकारच्या विषाणूमुळे होणारा आजार आहे.

रेबीज हा आजार एक प्रकारच्या विषाणूमुळे होतो. हे विषाणू सुळे असलेल्या प्राण्यांमध्ये (म्हणजे कुत्री, कोल्हे, मांजरे, लांडगे, इ.) असाच रोग निर्माण करतात. जंगलातल्या या रोगाचा प्रसारभटक्या कुत्र्यांमार्फत मनुष्यवस्तीत होत असतो.
रेबीज हा आजार एकदा झाल्यावर यातून जगणे अशक्य असते. म्हणूनच कुत्रे चावल्यावर लोकांना एक विलक्षण भीती वाटत असते. पिसाळी रोग झालेल्या कुत्र्या किंवा प्राण्यामार्फतच माणसाला रेबीज हा आजार होऊ शकतो. म्हणूनच कुत्रे चावल्याच्या घटना खूप घडत असल्या तरी त्यातल्या एखाद्यालाच खरा धोका असतो. दरवर्षी भारतात कुत्रे चावण्याच्या लाखो घटना होतात. यापैकी सुमारे 50 हजार जण मरण पावतात. हे दु:खद सत्य आहे. रेबीज रोग कसा होतोकोणत्याही जखमेवर विषाणूयुक्त लाळ सांडली की लागण होते. त्वचेवर जखम असल्यास रेबीज विषाणू प्रवेश करू शकत नाहीत.
रेबीज या आजाराचे विषाणू चेतातंतूतून पसरतात. पिसाळी रोग झालेल्या कुत्र्याच्या (किंवा प्राण्यांच्या) लाळेमध्ये हे विषाणू असतात. लाळेमध्ये विषाणू उतरल्यावर साधारणपणे दहा दिवसांत तो प्राणी मरतो.
कुत्रा चावल्यानंतर रेबीज हे विषाणू जखमेत पसरतात. त्यानंतर चेतातंतूंवर हल्ला करून त्यामार्फत ते मेंदूत प्रवेश करतात. (रक्तावाटे ते पसरत नाहीत). मेंदूत प्रवेश केल्यानंतर मेंदूला हळूहळू सूज येते व मेंदू निकामी होतो. हळूहळू रुग्ण अंथरुणाला खिळतो.
साधी पाणी पिण्याची क्रियाही खूप वेदनादायक होते. पिसाळी झालेल्या रुग्णाच्या लाळेत, अश्रूत आणि लघवीत रेबीज हे विषाणू मोठया संख्येने असतात. तरीही आतापर्यंत रुग्णापासून जवळच्या माणसाला किंवा डॉक्टर -नर्सला पिसाळीची लागण झाल्याची एकही घटना झालेली नाही.
भारतात दरवर्षी पिसाळी रोगाने 25000-50000 मृत्यू होतात, तरीही अशी घटना झालेली नाही हे विशेष आहे.
चावल्याच्या ठिकाणी स्नायूंमध्ये विषाणू संख्येने वाढत जातात. चेतातंतूतून द्रव पदार्थाबरोबर ते कण्यातल्या चेतारज्जूमध्ये प्रवेश करतात. या जागीपण ते थोडा दाह निर्माण करतात. या दाहामुळे विषाणू जिथून निघाले त्या जागी विचित्र संवेदना होते व बधिरता येते. यानंतर चेतारज्जूतून ते संख्येने वाढत जातात आणि पेशीपेशींमार्फत ते पसरत जातात. शिवाय ते मेंदूजलातही उतरतात. तिथून मेंदूमध्ये सर्वत्र पसरायला त्यांना सोपे होते. यानंतर मेंदूतून ते चेतातंतूद्वारा लाळ-पिंडात उतरतात. तोपर्यंत त्या व्यक्तीला पिसाळीने पूर्ण ग्रासलेले असते. अशा रितीने दुस-याच्या लाळेतून माणसाच्या जखमेत, तिथून मेंदू, तिथून माणसाची लाळ असे एक जीवनचक्र हे विषाणू पूर्ण करतात.
मात्र माणसात त्यांचा एक प्रकारे शेवट होतो. माणसापासून ते इतर प्राण्यांना किंवा माणसांना फारसे बाधू शकत नाहीत. स्वत:ची संख्या वाढवणे ही प्रत्येक जीवाची निसर्ग प्रवृत्ती असते. माणसात रेबीज हे विषाणू संख्येने वाढतात पण पुढचा रस्ता त्यांना बंद असतो. मात्र प्राण्यांमध्ये त्यांचा प्रवास व वंश चालूच राहतो.

Leave a Comment