5 Benefits of Eating Curd Rice
Curd rice, an Ayurvedic medicine…
दहीभात, एक आयुर्वेदिक औषध…
Earlier it was essential to eat rice at the end of every meal and that too curd rice. And that rice would grow insistently even if no one wanted it! It used to be said while insisting, “Eating the last dahi rice brings wealth to the father-in-law. And the first lion’s share of that wealth goes to the father-in-law!”
But then that son-in-law used to eat the last dahi rice with ease and happiness!
There are so many examples in our religion that religion has easily implanted in people’s daily life as unavoidable.
Let’s know 5 benefits of eating curd rice…
- It is beneficial to eat curd rice after fever. Often there is no desire to eat anything in fever. But eating curd rice gives the body a lot of energy. Also, curd increases your immunity.
- Eating other foods is restricted when the stomach is upset. But curd rice calms the stomach. Food is digested properly and relieves diarrhea.
- If you suffer from constipation, consume curd rice for a few days. It is rich in good bacteria. It improves digestion and helps in reducing constipation.
- Eating curd rice reduces stress. Probiotic bacteria, antioxidants and good fats in it help improve mood.
- Regular consumption of curd rice leads to weight loss. Curls decrease.
The secret of happiness is hidden in yogurt; What does the scriptures say? Benefits of Eating Curd Rice…
We offer curdled rice on Ganapati’s hand. Also Brahmin class eat curd rice. And how it is right is proved now.
Ayurveda, which is known as the oldest science in the world, has prescribed the exact method of human food. According to this, in earlier times, the meal was concluded by eating curd rice. Ever wondered the reason behind this?
Eating curd rice improves brain function...
Yogurt contains a chemical called tryptophan, which is essential for the human body.
But surprisingly, this chemical is not produced in the human body. This means that our body gets this chemical from the things we eat. When it mixes with other substances in the body, the chemicals serotonin and melatonin are produced. Its serotonin is very good for brain function. It has benefits such as improved mood, better sleep, improved memory. In order for tryptophan to increase brain function, it needs to reach the blood stream to the brain. It is not as simple as other chemicals. For this, tryptophan has to be broken down with carbohydrates. With the help of carbohydrates, tryptophan reaches the blood of the brain.
Now the question will arise that after talking about carbohydrates, why should curd be eaten with rice? The main reason for this is that rice is high in carbohydrates. Therefore, eating curd rice produces more serotonin in the brain. By doing this, you help improve brain function. Hence, a little bit of curd while finishing the meal.
It would not be wrong to say that eating curd rice not only increases the speed of brain work but also helps one to be happy.
There is a common misconception that eating rice leads to weight gain and flatulence. But eating curd rice can be beneficial. So the weight does not increase but decreases. Today’s lifestyle definitely affects health. Earlier, curd rice was eaten with relish.
दहीभात, एक आयुर्वेदिक औषध…
पुर्वी रोज भोजन करताना शेवटी भात खाणे व तोही दहीभात खाणे अत्त्यावश्यक असायचे. आणि तो भात कोणी नको म्हटलं तरी आग्रहपूर्वक वाढला जायचा! आग्रह करताना सांगितले जायचे, ” शेवटचा दहीभात खाण्याने सासरवाडीला श्रीमंतीचे भाग्य येते. आणि त्या श्रीमंतीचा पहिला सिंहाचा हिस्सा जावईबापूंनाच लाभतो ! “
मग मात्र तो जावई, निमूटपणे व आनंदी होऊन शेवटचा दहीभात खात असे !
आपल्या धर्मात अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जी धर्माने सहजासहजी लोकांच्या रोजच्या जीवनात, न टाळता येणारी म्हणून बसविली आहेत.
जाणून घेऊया दही भात खाण्याचे 5 फायदे…
- ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच दह्यामुळे तुमची इम्मुनिटी वाढते.
- पोट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भाताने पोट शांत होते. अन्न व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळतो.
- तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया असतात. त्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- दही भात खाल्याने तणाव कमी होतो. त्यात असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरीया, अॅंटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्स यामुळे मुड सुधारण्यास मदत होते.
- दही भात नियमित खाल्याने वजन कमी होते. कॅरलीज घटतात.
दहीभातात दडलंय आनंदाचे रहस्य; काय म्हणते शास्त्र ?
आपण गणपतीच्या हातावर दही भात देतो. तसेच ब्राम्हण वर्ग दही भात खातात.व तो कसा योग्य आहे ते आता सिद्ध झाले आहे.
जगातील सर्वात जुने शास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या आयुर्वेदात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे. यानुसारच पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का?
दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते …
मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते.
पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. याचाच अर्थ असा की, आपण खाल्लेल्या गोष्टींपासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटकांसोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही रसायने तयार होतात. त्यातील सेरटोनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे. त्याने आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात. ट्रिप्टोफॅनने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला मेंदूत जाणाऱ्या रक्तापर्यंत जावे लागते. ते इतर रसायनांएवढे सोपे नाहीये. त्यासाठी ट्रिप्टोफॅनचे कर्बोदकांबरोबर विघटन व्हावे लागते. कर्बोदकांच्या मदतीने ट्रिप्टोफॅन मेंदूच्या रक्तापर्यंत पोहोचते.
आता असा प्रश्न पडेल की कर्बोदक सांगितल्यावर दही भाताबरोबरच का खावे? याचे प्रमुख कारणे म्हणजे तांदळामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करता. त्यामुळे यापुढे जेवणाची सांगता करताना थोडातरी दहीभात.
दहीभात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासही मदत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा सर्वसामान्य गैरसमज आहे. मात्र दही भात खाणे हितकारक ठरू शकते. त्यामुळे वजन वाढत नाही तर कमी होतं. आजकालच्या जीवनशैलीचा परिणाम नक्कीच आरोग्यावर होतो. पुर्वी दही भात आर्वजून खाला जात असे.