Herpes zoster Disease 5 Symptoms and Remedies

Herpes zoster is a very painful disease. Small rashes, sores spread in a diagonal motion up and down the body are called Visarpa or Herpes in practice/नागीण हा अत्यंत वेदनादायी आजार आहे. शरीरावर लहान लहान पुरळ, फोड वर नि खाली तिरप्या गतीनं पसरतात त्यास विसर्प किंवा व्यवहारात नागीण असं म्हणतात.

In this, the speed of its formation, its spread is fast, so it is called Visarpa. There are many misconceptions about this in the society. There are many misconceptions that when this disorder occurs, it causes the body to deteriorate, followed by death. But this disease comes at a rapid pace and spreads widely. There is pain and severe inflammation. So there is a pull. Movement is limited. It spreads in the direction of blood vessels or veins in the body.

Herpes zoster

Why is herpes?

This disease is mainly caused by contamination of blood and bile. Excessive consumption of salty, spicy, hot foods, curd, fermented foods, liquor (daru), green leafy vegetables, kharvas, sesame, udi, kulith (dulge), frequent consumption of foods like fish, mutton, garlic, eating the opposite diet. This disorder occurs due to other reasons.

Symptoms of Naagin/herpes disease :-

In the beginning, symptoms like reddening of the skin and burning of the skin occur. Fever is rare. Then come severe painful blisters. Rarely it contains water or pus. There is a fire, there is a pull. The area affected by such blisters cannot be moved. Herpes zoster Even the touch of a rare cloth is not tolerated. Symptoms like restlessness and insomnia also occur. Such blisters can appear on any part of the body. From head to back, abdomen, face, thighs, legs, etc., this disease can affect any part of the body. The speed of its spread, its appearance, severe inflammation and pain increase discomfort after herpes.

Remedy for snake disease/herpes disease :-

It has different types depending on the defect and nature. But chiefly the evils of blood and bile are characteristically found. The speed with which this disease comes on also slows down. But in rare cases, after the blisters disappear, the pain or tenderness at the site remains for several days. Otherwise, herpes gets reduced in 7-8 days. When treating this, skip it initially. Take foods that are easy to digest like rice cakes, sali lahyas, vegetable soups. After that we should take laxatives. This immediately reduces the amount of pitta and reduces pain and inflammation i.e. inflammation. Medicines like castor oil, gandharva haritaki, abhayadi modak should be taken on the advice of a doctor for diarrhea. Among other medicines, many medicines like Arogyavardhini, Chandrayana Rasa, Gandhak Rasayan, Kaishore, Guggul, Laghu Sutshekhar, Vishantidudh Vati, Prabal Bhasma, Ushirasav, Chandanasav, Sarivadyasav, Agnitundi Vati are useful. It is experienced that Ayurvedic medicines are effective and quick in this disorder. Mainly in the months of March, April, May, patients of this disorder are seen in large numbers.

To reduce inflammation and pain :-

To reduce inflammation and inflammation, apply medicinals like vala, sandalwood, gauric on top. Also apply medicines like Shatghaut Dhrut, Kailas Jeevan, cow ghee. This involves removing a specific amount of blood from the body to relieve pain immediately. As 5-10 cc of blood is drawn for testing in the laboratory. Accordingly, 70-80 cc of blood should be removed in this disorder. Blood is drawn mainly from the vein of the elbow joint. In rare cases, the blood can be removed by cauterization. But there is no effective cure like Raktamokshan in this disorder. In many patients, the sores heal after the herpes infection is cured. But instead the pain lasts for several days. In such a case, the pain and neuralgia will be cured quickly if blood is collected by putting the jalwa on the affected area.

Nowadays we see many patients with this disorder. There are many types with slight differences. They need to be properly diagnosed. Herpes is usually diagnosed immediately if a red rash and pain appear. But often it is not. For this reason, get the diagnosis and treatment from a suitable doctor. Many patients seek mantra treatment from Mantrika. It is inappropriate. Mantras do not cure such disorders. The real cure for nagini is proper treatment and strict regimen. It is necessary to follow proper diet in herpes disorder. Virechan, Raktamokshan and Abhyaantar are more effective Ayurvedic treatments in this disorder.

Herpes zoster

नागीण आजार : लक्षणे आणि उपाय :-

नागीण हा अत्यंत वेदनादायी आजार आहे. शरीरावर लहान लहान पुरळ, फोड वर नि खाली तिरप्या गतीनं पसरतात त्यास विसर्प किंवा व्यवहारात नागीण असं म्हणतात. यामध्ये याची निर्मिती, ते पसरण्याची गती तीव्र असते म्हणून त्यास विसर्प असे म्हणतात. समाजात यामध्ये बरेच गैरसमज आहेत. हा विकार झाल्यावर तो शरीराला विळखा घालतो, नंतर मृत्यू येतो यासारखे बरेच गैरसमज आहेत. परंतु ही व्याधी तीव्र गतीनं येते, भराभर पसरते. वेदना आणि तीव्र दाह असतो. त्यामुळे ओढ लागते. हालचालीला मर्यादा येते. शरीरातील रक्तवाहिन्या किंवा वातनाड्यांच्या दिशेनं तो पसरत जातो.

नागीण का होते?

प्रामुख्यानं रक्त आणि पित्त दूषित झाल्यानं ही व्याधी होते. खारट, तिखट, उष्ण पदार्थ अतिमात्रेत सेवन करणं, दही, आंबवलेले पदार्थ, मद्य (दारु), हिरव्या पालेभाज्या, खरवस, तीळ, उडीद, कुळीथ (डुलगे) यासारखे पदार्थ, मासे, मटन, लसूण यासारखे पदार्थ वारंवार खाणं, विरुद्ध आहार सेवन करणं इत्यादी कारणांनी हा विकार होतो.

नागीण आजार लक्षणं :-

यामध्ये सुरुवातीला त्वचा लाल होणं, त्याची आग होणं यासारखी लक्षणं उत्पन्न होतात. क्वचित ताप येतो. नंतर तीव्र वेदनायुक्त फोड येतात. क्वचित त्यात पाणी किंवा पू असतो. आग होते, ओढ लागते. ज्या भागावर असे फोड येतात त्यास हालचाल करता येत नाही. क्वचित कपड्याचा स्पर्श सुद्धा सहन होत नाही. अस्वस्थता, निद्रानाश यासारखी लक्षणं सुद्धा निर्माण होतात. शरीराच्या कोणत्याही भागावर यासारखे फोड येऊ शकतात. डोक्यापासून ते पाठ, पोट, चेहरा, मांडी, पाय इत्यादी कोणत्याही अवयवावर ही व्याधी होऊ शकते. याची पसरण्याची गती, त्याचं स्वरूप, तीव्र दाह आणि वेदना यामुळे नागीण झाल्यावर अस्वस्थता वाढते.

उपाय :-

याचे दोषानुसार आणि स्वरूपानुसार विविध प्रकार पडतात. परंतु प्रामुख्यानं रक्त आणि पित्त यांची दुष्टी विशेषत्वानं आढळते. ही व्याधी ज्या वेगात येते तशी ती गतीने कमी सुद्धा होते. परंतु क्वचित प्रसंगी ते फोड नाहिसे झाल्यावर त्या जागी वेदना किंवा ओढ बरेच दिवस टिकते. अन्यथा ७-८ दिवसात नागीण कमी होते. यावर उपचार करताना सुरुवातीला लंघन करावं. पचायला हलके पदार्थ जसे भाताची पेज, साळीच्या लाह्या, भाज्यांचं सूप यासारखे पदार्थ घ्यावेत. नंतर विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध घ्यावं. यामुळे पित्ताचे प्रमाण त्वरित कमी होते आणि वेदना आणि दाह म्हणजे जळजळ कमी होते. विरेचनासाठी एरंडेल तेल, गंधर्व हरितकी, अभयादि मोदक यांसारखी औषधं वैद्यांच्या सल्ल्यानं घ्यावीत. अन्य औषधी मध्ये आरोग्यवर्धिनी, चंद्रयान रस, गंधक रसायन, कैशोर, गुगुळ, लघु सूतशेखर, विषांतिदूध वटी, प्रबाळ भस्म, उशिरासव, चंदनासव, सारिवाद्यासव, अग्नितुंडी वटी यासारखी अनेक औषधे उपयुक्त ठरतात. या विकारात आयुर्वेदीय औषधांचा उपयोग चांगला आणि लवकर होतो असा अनुभव आहे. प्रामुख्याने मार्च, एप्रिल, मे या महिन्यात या विकाराचे रुग्ण जास्त संख्येने पाहायला मिळतात.

दाह आणि वेदना कमी करण्यासाठी :-

दाह व जळजळ कमी करण्यासाठी वरून वाळा, चंदन, गौरिक यासारख्या औषधींचा लेप लावावा. तसेच शतघौत धृत, कैलास जीवन, गायीचं तूप यासारख्या औषधांचा लेप लावावा. वेदना त्वरित कमी करण्यासाठी यामध्ये रक्तमोक्षण म्हणजे शरीरातून विशिष्ट प्रमाणात रक्त काढून टाकतात. जसे लॅबोरेटरी मध्ये तपासणीसाठी ५-१० सीसी रक्त काढलं जातं. त्याप्रमाणे या विकारात ७०-८० सीसी रक्त काढून टाकावं. प्रामुख्यानं हाताच्या कोपराच्या सांध्याच्या शिरेमधून रक्त काढतात. क्वचित प्रसंगी जळवा लावून रक्त काढून टाकता येतं. परंतु रक्तमोक्षण सारखा प्रभावी इलाज या विकारात नाही. अनेक रुग्णांमध्ये नागीण हा विकार बरा झाल्यावर जखमा भरून येतात. परंतु त्याजागी वेदना अनेक दिवस टिकतात. अशावेळी जळवा त्या स्थानी लावून रक्तमोक्षण केल्यास त्या वेदना, न्यूराल्जिया लवकर बऱ्या होतात.

आजकाल हा विकार झालेले बरेच रुग्ण पाहायला मिळतात. यामध्ये थोड्याफार फरकानं बरेच प्रकार आहेत. त्यांचं योग्य पद्धतीनं निदान होणं आवश्यक असतं. साधारणत: लालसर रंगाची पुरळ आणि वेदना दिसल्यास लगेच नागीण असं निदान करतात. परंतु बऱ्याच वेळा तसं नसतं. यासाठीच योग्य वैद्यांकडून निदान करून घेऊन चिकित्सा घ्यावी. अनेक रुग्ण मांत्रिकाकडूून मंत्रोपचार घेतात. ते अयोग्य आहे. मंत्रांनी असे विकार बरे होत नाहीत. नागिणी वरचा खरा उपाय म्हणजे योग्य उपचार आणि काटेकोर पथ्यं पाळणं हाच आहे. नागीण विकारात योग्य पथ्य पाळणं आवश्यक असतं. विरेचन, रक्तमोक्षण व आभ्यांतर हे आयुर्वेदिक उपचार या विकारात जास्त फलदायी ठरतात.

Herpes zoster

Leave a Comment