Suffering from neck, back, waist and heel pain? Take care to get relief…
Heel pain is a disease that does not cause much trouble at first, but if not treated in time, it becomes very troublesome. Most of the people start suffering from this heel pain after waking up in the morning. Gradually, the heel pain starts increasing even while sitting and standing up. This disease is related to bones. In this disease, home remedies are often done; but the pains that have been suffering for a long time increase, then their seriousness starts to be noticed. In this disease, there is a possibility of reducing a lot of the disease if some regimens are followed.
What to Eat ?
Drinking boiled hot water is definitely beneficial
It is better to take cow’s milk
Put black pepper in curd and consume it during the day.
Adding ginger and eggs to buttermilk is also beneficial.
Soaking fenugreek seeds in water overnight and drinking the water the next morning helps to cure heel pain.
There is no problem in using tamarind, lemon, kokum. Consumption of fruits such as Boron, Guava, Pomegranate, Dates is beneficial.
Follow any Diet :-
Avoid swimming in cold water and sitting with your feet in cold water.
Sweet potatoes, sago, potato products etc. Avoid fatty foods from the diet.
Do not consume Usala, White Peas, Kadve Wal, Chawli, Matki among vegetables.
Non-vegetarians should preferably avoid dried fish/dried meat as well as preserved meat/meat products.
Fermented foods should be avoided. Fruits/other foods with astringent juice and sour juice are harmful.
मान, पाठ, कंबर आणि टाचदुखीवर उपाय :-
टाचदुखी एक असा आजार आहे ज्याचा सुरुवातीला फारसा त्रास होत नाही, पण वेळीच उपचार न केल्यास तो खूप त्रासदायक बनतो. सकाळी उठल्यानंतर बहुतेकांना या टाचदुखीचा त्रास सुरू होतो. हळुहळु, बसलेले आणि उभे असताना देखील टाचदुखी वाढू लागते. हा आजार हाडांशी संबंधित आहे. या आजारात अनेकदा घरगुती उपचार केले जातात; पण खूप दिवसांपासून होत असलेल्या वेदना वाढल्या की त्यांचे गांभीर्य लक्षात येऊ लागते. या आजारात काही पथ्ये पाळल्यास हा आजार बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता असते.
काय खावे व काय खाऊ नये :-
उकळलेले गरमच पाणी करून प्यायल्याने निश्चित उपयोग होतो
गाईचे दूध घेतल्यास बरे
दह्य़ात काळी मिरी टाकून दिवसा त्याचे सेवन करावे.
ताकात आले,ओवा घालून घेतल्यानेही फायदा होतो.
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यायल्यास टाचदुखी बरी होण्यास मदत होते
चिंच,लिंबू,कोकम यांचाही वापर करायला हरकत नाही. बोरं, पेरू, डाळिंब, खजूर या फळांचे सेवन गुणकारी ठरते.
कोणकोणती पथ्य :-
थंड पाण्यात पोहणे व थंड पाण्यात पाय सोडून बसणे पूर्णत: टाळा.थंड पाण्याने आंघोळसुद्धा शक्यतो करू नये
रताळी,साबुदाणा, बटाटय़ाचे पदार्थ इ. स्निग्ध गुणांचे पदार्थ आहारातून वर्ज्य करा.
भाज्यांमध्ये उसळ,पांढरे वाटाणे,कडवे वाल,चवळी, मटकी यांचे सेवन करू नये.
मांसाहारी व्यक्तींनी सुके मासे/वाळवलेले मांस तसेच साठवून ठेवलेले मांस/ मांसाचे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत.
आंबवलेले पदार्थ टाळायला हवे.तुरट रसाची व आंबट रसाची फळे/इतर पदार्थ खाणे अहितकारक असते.