What Is Use of Paracetamol ? 24

Paracetamol is available in tablet and liquid form.

पॅरासिटेमॉल हे औषध गोळ्यांच्या तसेच पातळ औषधाच्या स्वरूपात मिळते.

This medicine reduces fever. This drug affects the temperature balancing center in the brain and reduces fever. Of course, taking paracetamol for any fever will reduce the fever. But one thing should be remembered that fever is not a disease but only a symptom of a disease.

या औषधामुळे ताप कमी होतो. मेंदूतील तापमानाचे संतुलन करणाऱ्या केंद्रावर या औषधामुळे परिणाम होतो व ताप कमी होतो. साहजिकच कोणत्याही तापासाठी पॅरासिटामॉल हे औषध घेतल्यास ताप कमी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ताप हा रोग नाही तर ते केवळ रोगाचे लक्षण आहे.

Most of the time you have gone to the drug store and brought back fever pills. Do you know that there is a drug called ‘Paracetamol’ in these pills which are sold under different names like Crocin, Metacin, Pamal?

औषधांच्या दुकानात जाऊन बर्‍याचदा तुम्ही तापासाठीच्या गोळ्या आणल्या असतील. क्रोसिन, मेटॅसीन, पॅमाॅल अशा विविध नावांनी विकल्या जाणाऱ्या या गोळ्यांमध्ये ‘पॅरॅसिटॅमॉल’ नावाचे एक औषध असते हे तुम्हाला ठाऊक आहे काय ?

The diagnosis of diseases (such as colds, tuberculosis) depends on when the fever occurs, how long it lasts, whether it is high or low. Therefore, taking paracetamol tablets for fever can make diagnosis difficult.

Do not take medicine after fever without doctor’s advice. No medicine is without side effects. So take medicine only if needed. In fact, home remedies such as wiping the body with cold water and applying cold water on the forehead can also reduce fever. These measures should be used on occasion.

There is no problem in taking this medicine for common diseases like cold, cough and fever. Apart from reducing fever, this medicine also relieves pain and reduces swelling.

ताप केव्हा येतो, किती वेळ राहतो, जास्त असतो वा कमी, यावर रोगांचे (जसे हिवताप, क्षयरोग) निदान अवलंबून असते. त्यामुळे ताप आल्या आल्या पॅरासिटेमॉलच्या गोळ्या घेतल्याने निदानात अडचण येऊ शकते.

ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज औषध घेऊ नये. कोणतेही औषध दुष्परिणामरहित नसते. त्यामुळे आवश्यकता असल्यासच औषध घ्यावे. खरे तर अंग थंड पाण्याने पुसणे, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे या घरगुती उपायांनीही ताप उतरतो. प्रसंगी या उपायांचा वापर करावा.

सर्दी, खोकला अशा सामान्य रोगात येणाऱ्या तापासाठी हे औषध घ्यायला हरकत नाही. ताप उतरण्याखेरीज हे औषध वेदनाशमनही करते व सूजही उतरवते.

Leave a Comment