Diabetes can be controlled and controlled by following a strict diet and exercise.
मधुमेह झाल्यावर अथक प्रयत्नाने संपूर्ण संयम पाळून,पथ्य पाळून हा रोग आटोक्यात आणता येतो, नियंत्रण शक्य आहे.
Even though there is honey in the name, the whole family of the patient is afraid of diabetes. What is diabetes? How to identify? What are the symptoms? What are the dangers of diabetes? What are the treatments? This complete scientific information is available today. Worryingly, young people in their thirties seem to be in the throes of diabetes. Sedentary lifestyles, lack of exercise, and improper, unrestricted eating habits are leading many young people to diabetes. They should be stopped immediately. Instead of getting treatment after the disease, there is a need to make sincere efforts to avoid the disease
नावात जरी मधु असला तरी रुग्णा बरोबर पूर्ण परीवाराला धास्ती वाटते तो मधुमेह। मधुमेह म्हणजे काय? कसा ओळ्खावा? लक्षणे काय ? मधुमेहाचे धोके काय आहेत ? उपचार काय आहेत ? ही संपूर्ण शास्त्रीय माहीती आज उपलब्ध आहे। चिंताजनक बाब ही आहे, की तिशी च्या आसपासचा तरुण मधुमेहाच्या विळख्यात सापडलेला दिसत आहे । बेठी जीवन पद्धती, व्यायामाचा अभाव, आणि अयोग्य, अनिर्बंध खानपान यामुळे अनेक तरुण मधुमेही होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत । त्यांना त्वरीत थांबवायला हवे। रोग झाल्यावर उपचार करीत बसण्या पेक्ष्या, आजार होऊच नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
Is your job sedentary? Do we take a vehicle even if it is a short distance to Jaya? Does anyone in your family have a history of diabetes? are you fat Do you consume too much flour, sugar, fast food, fried foods, artificial cold drinks? Do you have complaints like worry, fear, severe anxiety, mental stress, irritability? Such questions should be asked to oneself, as much as it is important to be conscious so that you never get diabetes, if you have diabetes, it is very important to change the wrong lifestyle and get the right advice to bring the blood sugar level to the right level. Since genetics is one of the causes of diabetes, it is better for everyone to have a sugar test without being negligent. It is a hidden disease and when it takes control of the body, various diseases are invited. Once diabetes occurs, the disease can be brought under control, control is possible, but it all depends on the will and cooperation of the patient.
आपले काम बैठे प्रकारातील आहे काय ? थोडसे अंतर जरी जयाचे असेल तरी आपण वाहन नेता का ? आपल्या कुटुंबातील कोणाला मधुमेहाचा इतीहास आहे काय ? आपण स्थुल आहात काय ? मैदा, साखर, फास्ट फ़ूड, तळलेले पदार्थ, कृत्रीम ठंड पेये यांचा अतीरेकी वापर आपण करता का ? आपल्याला काळजी, भीती, तीव्र चिंता, मानसीक ताण, चीडचीड होणे आश्या तकरारी आहेत काय ? असे प्रश्न स्वत:ला विचारायला हवेत, स्वता:ला कधीही मधुमेह होणार नही यासाठी जागरूक आसणे जितके महत्वाचे आहे, तितकेच मधुमेह झाला आसल्यास चुकीची जीवन शैली बदलवून, योग्य सल्ला घेवून रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य स्थितीत आणणे अती महत्वाचे आहे। अनुवांशिकता हे मधुमेहाचे एक कारण असल्या मुळे गाफील न रहता प्रत्येकाने सुगर टेस्ट केलेली बरी। हा एक छुपा रोग असून शरीराचा ताबा मिळवल्यावर विविध आजारांना निमंत्रण दिले जाते। एकदा मधुमेह झाल्यावर अथक प्रयत्नाने संपूर्ण संयम पाळून,पथ्य पाळून हा रोग आटोक्यात आणता येतो, नियंत्रण शक्य आहे, मात्र रोग्याची इच्छाशक्ती आणि सहकार्य यावरच सर्व कही अवलंबून आहे
Diabetes can be effectively controlled by proper medicine plan, ideal lifestyle, habit and love of walking a lot, proper exercise in clean environment, ideal diet prescribed by dietician, complete faith in God as nature and a positive and moderate mind with sattva qualities. This is accepted by modern medicine. In fact, why wait for diabetes to adopt this kind of positive lifestyle? Every young man and woman really needs such counseling. If the right culture is given in childhood, steps will never be taken in the wrong direction. The main thing is that even the disease will not turn to such healthy healthy children. It is only in our own hands to try how to live healthy till the end as much and as much life as we have got.
So young people keep diabetes away for life.
योग्य औषध योजना आदर्श जीवन शैली, भरपूर पायी चालण्याची सवय व आवड, शुद्ध वातावारणात योग्य व्यायाम आहार तज्ञाने ठरवुन दिलेला आदर्श आहार, निसर्ग रूपी इश्वरावर संपूर्ण श्रद्धा आणि सत्व गुण युक्त सकारात्मक संयमी मन या द्वारेच मधुमेहावर नीत्य नियंत्रण ठेवता येते। ही गोष्ट आधुनिक वैद्यक शास्त्र मान्य करतं । याप्रकराची सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्यासाठी खरे म्हणजे मधुमेह होण्याची वाट का बरे पहावी ? प्रत्येक तरुण मुलामुलींना अशा समुपदेशनाची खरी गरज आहे। बालवयात योग्य संस्कार झाले तर चुकीच्या दिशेने कधी पावले वळणार नाहीत। मुख्य म्हणजे रोग सुद्धा अश्या सुदृढ निरोगी मुलांकडे फिरकणार नाही। जेवढे आणि जितके आयुष्य आपल्याला लाभले आहे ते शेवट पर्यन्त निरोगी कसे जगता येईल या साठी प्रयत्न करणे फक्त आपल्या स्वतःच्या हातात आहे,
तेव्हा तरुणांनो दूर ठेवा मधुमेहाला जन्मभर