Effects of pain killer pills on the body

A pain killer is a painkiller…पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध.

Life today is very stressful. Everyone is busy with their work, due to this busy life style, no one has time to relax completely, so they face various diseases. Sometimes these pains become unbearable and due to lack of time one has to take painkillers so that they can continue with their next work. But taking these pills is not a permanent cure, it is temporary and many people do not know that they can have bad side effects from these pain killers later on.
Why do people take more painkillers? When we have pain and the pain becomes unbearable, we take pain killers to relieve the pain. Because these pills provide immediate relief and slowly we get used to these pills, if we continue to take these pills, it can become dangerous for us in the long run.

आजचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे. सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, या व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधीना सामोरे जावे लागते. कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता येईल. पण या गोळ्या घेतल्याने कायम स्वरूपी इलाज होत नाही तो तात्पुरता असतो आणि बऱ्याच जणांना हे माहित नसते कि पुढे जाऊन त्यांना या वेदना नाशक गोळ्यांचे वाईट दुष्परिणाम होऊ शकतात.
जास्त करून लोक वेदना नाशक गोळ्या का घेतात ? जेंव्हा आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना असहनीय होतात तेंव्हा त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आपण पेन किलर घेतो. कारण या गोळ्यांमुळे लगेचच आराम मिळतो आणि हळू हळू आपल्याला या गोळ्यांची सवय लागते, या गोळ्या जर आपण सतत घेत असू तर आपल्याला हे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकते.

Effects of pain killer pills on the body

Damage caused by pain killer pills…

  • Taking too many pain killers makes us look older.
  • Never take such pills on an empty stomach as it can cause kidney problems. Also taking it daily also causes problems related to liver.
  • Daily intake of such pills makes us nervous, sleepless, and restlessness increases.
  • Taking pain killers in excess also lowers blood pressure.

पेन किलर गोळ्यांमुळे होणारे नुकसान:-

  • पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्या मुळे आपण वयस्कर दिसू लागतो.
  • रिकाम्या पोटी कधीही अशा गोळ्या घेऊ नका कारण यामुळे किडनी ( मूत्रपिंड ) संबंधी समस्या होऊ शकतात. तसेच रोज घेतल्याने यकृत सबंधीही समस्या उद्भवतात.
  • अशा गोळ्या रोज घेतल्याने आपल्याला घाबरल्या सारखे होते, निद्रानाश होते, तसेच अस्वस्थता वाढते.
  • पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब देखील कमी होतो.

You can take pain killers by keeping certain things in mind.

  • Take these tablets 30 minutes after eating.
  • Try to take pain killers as little as possible.
  • If the pain is similar and unbearable, consult a doctor.
  • Pain killers should always be taken with water.
  • Pain killer tablets should always be taken with the doctor’s advice.

काही खास गोष्टी लक्षात ठेऊन आपण पेन किलर घेऊ शकता.

  • जेवल्यावर ३० मिनिटांनंतर ह्या गोळ्या घ्या.
  • पेन किलर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा.
  • जर वेदना सारख्या सारख्या आणि असहनीय होत असतील तर डॉक्टर चा सल्ला घ्या.
  • पेन किलर नेहमी पाण्या सोबतच घेतल्या पाहिजेत.
  • पेन किलर च्या गोळ्या ह्या नेहमी डॉक्टर च्या सल्याने घेतल्या पाहिजेत.

Leave a Comment