महाराष्ट्र शासन
इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२३-२४
महाराष्ट्र शासन
इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती) ,महाराष्ट्र राज्य, नागपूर.
*मिलिट्री भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023-24 या वर्षांमध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाइन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
* त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
* प्रशिक्षणासाठी एकूण मंजूर विद्यार्थी संख्या पंधराशे (1500) इतकी आहे.
* प्रशिक्षणाचा प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने (६ महिने) इतका आहे.
* विद्यावेतन दहा हजार (१०,०००) प्रतिमा प्रति महिना इतका आहे.
* उपस्थिती 75 टक्के आवश्यक आहे.
* आकस्मिक निधी बारा हजार (१२,०००) (एक वेळ) इतका आहे.
मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२३-२४ योजनेच्या लाभासाठी पात्रता *
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी.
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
- विद्यार्थी नॉन-क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा असावी.
- विद्यार्थी बारावी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा बारावी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
- महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- विद्यार्थ्यांची अंतिम निवड छाननी प्रक्रिये द्वारे करण्यात येईल.
- विद्यार्थ्यांचे किमान वय १७ वर्ष व कमाल वय 21 वर्षे पेक्षा जास्त असू नये.
* वैद्यकीय मापदंड/मानक :-
* उंची :- कमीत कमी 157cm (पुरुष)
कमीत कमी 152 cm (महिला)
* छाती :- कमीत कमी 77cm (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 सेंटीमीटर) केवळ पुरुषांकरिता.
* प्रशिक्षणाकरिता द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके :-
- उमेदवाराचे शारीर मजबूत आणि चांगले निरोगी असावे.
- मानसिक आरोग्य चांगले असावे.
- छातीचा विकास कमीत कमी पाच सेंटीमीटर विस्तारित असावा.
- प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये चांगली दृष्टी असणे आवश्यक आहे.
- त्याला प्रत्येक डोळ्याने अंतराचा 6/6 दृष्टिकोन वाचता आला पाहिजे.
- एकंदरीत सहभागी होणारा व्यक्ती शारीरिक, मानसिक निरोगी असावा.
* 👉 सविस्तर माहितीपुस्तिका पाहण्यासाठी इथे 👉click करा व माहिती pdf मध्ये वाचा …
* ग्रामीण डाक सेवक (GDS) भारती १२८२८ जाजांच्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा…
* रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या कडून स्थानिक नियुक्तीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घड्याळाच्या तासाच्या आधारावर(सन २०२३-२०२४ साठी निव्वळ तात्पुरत्या तत्त्वावर) च्या माहितीसाठी 👉 इथे CLICK करा.
धन्यवाद…