अरेरे !!! असेही एक गाव 2023-उपोषणाचा आजचा तिसरा दिवस-प्रशासनाचे दुर्लक्षच…
* सलग तिसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरूच आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष…
अरेरे!!! असेही एक गाव या सदराखाली गेल्या तीन दिवसापासून पेपर मध्ये बातम्या येत आहेत. आजूबाजूच्या पाच ते दहा गावांमध्ये ही बातमी पसरलेली असून देखील अजूनही शासनाने कसल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.यावरून शासनाची ढिसाळ कार्यप्रणाली दिसून येत आहे.
गाव सुशी, तालुका-गेवराई, जिल्हा-बीड येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्ट व हेकेखोर कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी विविध मागण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून उपोषण सुरू केलेले आहे. दरम्यान या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पंचायत समिती गेवराई, तहसील कार्यालय गेवराई किंवा इतर कोणत्याही शासकीय कार्यालयातून कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी याची दखल
घेतलेली नाही. प्रशासन डोळे बंद करून फक्त कानाने ऐकत आहे.
भ्रष्ट ग्रामपंचायतीला प्रशासन पाठीशी घालत असल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. जोपर्यंत ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा
उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. ग्रामसेवक व सरपंच यांनी संगणमत करून कागदोपत्री शौचालय
तसेच इतर कामे दाखवत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे असे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे म्हणणे आहे व त्याची चौकशी करण्यात यावी असे त्यांचे सरळ सोपे म्हणणे आहे.
त्यातच ग्रामपंचायत कार्यालय देखील बंद असते (कधीतरी आप्तेष्टांचे काम असल्यास उघडते). त्यामुळे जाब विचारायचा कोठे असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील सर्व ग्रामस्थांनी मंगळवार पासून बेमुदत उपोषणास सुरुवात केलेली आहे.
उपोषणाचा आजचा तिसरा दिवस मात्र या आंदोलनाकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जुजबी चर्चा करायची म्हणून दुसऱ्या दिवशी विस्तार अधिकारी साहेब यांनी आंदोलन स्थळी भेट
दिली. मात्र कोणतेही ठोस पाऊल न उचलता ते परत गेले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी
आंदोलन परत घेण्यास नकार दिला आहे.
आता पाहणे हेच आहे कि अधिकारी/कर्मचारी हे गावातील गोरगरीब ग्रामस्थांची दखल घेतात की नाही? का फक्त लोकशाही ही बोलण्यापुर्तीच उरलेली आहे. बाकी सर्व दडपशाही व हुकूमशाही
चाललेली आहे.
या प्रकरणाशी संबंधित अधिकारी/पदाधिकारी/शासकीय अधिकाऱ्यांनी/निम-शासकीय संस्थांनी यामध्ये पुढाकार घेऊन योग्य तो न्याय निवडा करून, सुशी या गावातील ग्रामपंचायत सदस्यांना व ग्रामस्थांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा. तरच म्हणता येईल लोकशाही
अजून जिवंत आहे. अन्यथा सर्वच अलबेल आहे…